Lokmat Agro >शेतशिवार > Ambiya Bahar Crop Insurance : २०२४ आंबिया बहर पीक विमा; विमा परताव्यात विलंब वाचा सविस्तर

Ambiya Bahar Crop Insurance : २०२४ आंबिया बहर पीक विमा; विमा परताव्यात विलंब वाचा सविस्तर

latest news Ambiya Bahar Crop Insurance: 2024 Ambiya Bahar Crop Insurance; Delay in insurance refunds Read in detail | Ambiya Bahar Crop Insurance : २०२४ आंबिया बहर पीक विमा; विमा परताव्यात विलंब वाचा सविस्तर

Ambiya Bahar Crop Insurance : २०२४ आंबिया बहर पीक विमा; विमा परताव्यात विलंब वाचा सविस्तर

Ambiya Bahar Crop Insurance : २०२४-२५ हंगामातील हवामान आधारित आंबिया बहर फळ पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात विलंब होत आहे. गतवर्षीचीच स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे शेतकरी विमा कवच घेण्यात अनिच्छुक झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर विमा परतावा देऊन शेतकऱ्यांचा विश्वास जपणे आवश्यक आहे. (Ambiya Bahar Crop Insurance)

Ambiya Bahar Crop Insurance : २०२४-२५ हंगामातील हवामान आधारित आंबिया बहर फळ पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात विलंब होत आहे. गतवर्षीचीच स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे शेतकरी विमा कवच घेण्यात अनिच्छुक झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर विमा परतावा देऊन शेतकऱ्यांचा विश्वास जपणे आवश्यक आहे. (Ambiya Bahar Crop Insurance)

शेअर :

Join us
Join usNext

Ambiya Bahar Crop Insurance : चांदूर जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांसाठी २०२४-२५ हंगामातील हवामान आधारित आंबिया बहर फळ पीक विमा परताव्यात होणारा विलंब शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न बनला आहे. (Ambiya Bahar Crop Insurance)

मागील वर्षी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडून उशिरा परतावा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना विमा काढण्यात अडचणी आल्या होत्या. यंदा मात्र सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनीकडून परतावा देण्यात जाणूनबुजून विलंब केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.(Ambiya Bahar Crop Insurance)

शेतकऱ्यांनी २०२४-२५ हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यात सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनीकडे हवामान आधारित फळपीक विमा नोंदविला होता. (Ambiya Bahar Crop Insurance)

मात्र, विमा हप्ता भरून, ट्रिगर कालावधी संपून चार महिने उलटूनही विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. गतवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळणारा विमा जानेवारी २०२५ मध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात आला.(Ambiya Bahar Crop Insurance)

शेतकऱ्यांची समस्या

जिल्ह्यातील ३,८३७ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी ३,८७५ हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे ३ कोटी ३० लाख ४२ हजार ५६० रुपये विमा हप्ता भरला होता. 

मात्र, विमा परतावा उशिरा मिळाल्यामुळे, अनेक शेतकरी नवीन हंगामासाठी विमा घेण्यात अडचणीत आहेत. यामुळे ते विमा कवच घेण्यास अनिच्छुक झाले आहेत.

दरवर्षी विमा परतावा उशिरा मिळाल्याने शेतकऱ्यांना नवीन विमा हप्ता भरण्यात त्रास होतो. यासाठी शासनाने विमा परतावा वेळेत दिला पाहिजे.- पुष्पक खापरे, जिल्हाधिकारी समिती शेतकरीपीक विमा प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या मागण्या

* विमा परतावा लवकरात लवकर देणे.

* संत्रा ट्रिगर कालावधी मे महिन्यापुरता मर्यादित न ठेवता, फळ तुटेपर्यंत लागू करणे.

* विमा परतावा विलंब टाळण्यासाठी शासन आणि विमा कंपन्यांदरम्यान समन्वय वाढवणे.

ट्रिगर अहवालावर कार्यवाही सुरू आहे. येत्या काही दिवसांत स्कायमेट व कृषी विभागाच्या अहवालानुसार शासनाकडून विमा कंपनीला परतावा प्रक्रियेसाठी सूचना दिल्या जातील. - राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधिकारी

विमा मिळणे म्हणजे संकटात सावर होण्याचा एक मार्ग. पण विलंबामुळे भविष्यात शेतकऱ्यांचा विश्वास कमी होतो. शासनाने यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे. - अक्षय गुर्जर,संत्रा उत्पादक

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करणारा हवामान आधारित पीक विमा हा योजना अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु विलंबामुळे याचा उद्देश कमी होतो. त्यामुळे शासन व विमा कंपन्यांनी यावर गंभीरपणे विचार करून लवकरात लवकर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते पुढील हंगामासाठी विमा कवच घेण्यास सक्षम होतील.

हे ही वाचा सविस्तर : Crop Disease Management : अतिवृष्टीनंतर पिकांवरील रोग व्यवस्थापन; वाचा प्रभावी उपाययोजना

Web Title: latest news Ambiya Bahar Crop Insurance: 2024 Ambiya Bahar Crop Insurance; Delay in insurance refunds Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.