Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > एआय शेती, शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे का, AI मूळ शेती बदलू शकते का? वाचा सविस्तर 

एआय शेती, शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे का, AI मूळ शेती बदलू शकते का? वाचा सविस्तर 

Latest news AI farming beneficial for farmers, can AI replace traditional farming Read in detail | एआय शेती, शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे का, AI मूळ शेती बदलू शकते का? वाचा सविस्तर 

एआय शेती, शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे का, AI मूळ शेती बदलू शकते का? वाचा सविस्तर 

Agriculture News : एआय म्हणजे शेतीतील यंत्रमानव नव्हेत. ती म्हणजे डेटावर आधारित निर्णयक्षमता जी माणसाच्या अनुभवाला वैज्ञानिक आधार देते.

Agriculture News : एआय म्हणजे शेतीतील यंत्रमानव नव्हेत. ती म्हणजे डेटावर आधारित निर्णयक्षमता जी माणसाच्या अनुभवाला वैज्ञानिक आधार देते.

Ai Agriculture : एकेकाळी शेती म्हणजे अनुभव, अंदाज आणि निसर्गावरची श्रद्धा होती. पावसाची दिशा, मातीचा स्पर्श, वाऱ्याची चाहूल या सगळ्यावर शेतकऱ्याचा निर्णय अवलंबून असे. आजही हा अनुभव अमूल्य आहे. पण बदलते हवामान, अनिश्चित पर्जन्यमान, वाढते तापमान, कीडरोगांचे नवे प्रकार आणि वाढती लोकसंख्या या सगळ्या दबावांमध्ये केवळ अनुभव पुरेसा राहिलेला नाही.

इथेच एआय शेती, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याला नवे रूप देत आहे. एआय म्हणजे शेतीतील यंत्रमानव नव्हेत. ती म्हणजे डेटावर आधारित निर्णयक्षमता जी माणसाच्या अनुभवाला वैज्ञानिक आधार देते. राष्ट्रीय स्तरावर एआयचा वापर केवळ एका शेतापुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरातून गोळा होणारी कीड, रोग, हवामान आणि उत्पादनाची माहिती एकत्र करून एआय आधारित पॅटर्न रिकग्निशन सिस्टीम्स (पीआरएस) तयार केल्या जात आहेत.

पीक उत्पादनाचा अंदाज
AI चा महत्त्वाचा उपयोग म्हणजे पीक उत्पादनाचा अंदाज. यासाठी वापरले जाते उपग्रह प्रतिमा, ऐतिहासिक उत्पादन डेटा, हवामान मॉडेल्स, माती आणि पाण्याची माहिती या सगळ्यांच्या आधारे एआय मॉडेल्स उत्पादनाचा अंदाज साधारण 10 टक्के अचूकतेने देऊ शकतात.

AI शेतीत काय बदलते?
रोग व कीड ओळख - डीप लर्निंग
सिंचन नियोजन प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स
उत्पादन अंदाज सॅटेलाइट एमएल -
रसायन वापर - गरजेनुसार

शेतकऱ्यांनाच फक्त फायदा होत नाही
साठवण व्यवस्था नियोजनात मदत होते. बाजारपेठेतील चढ-उतार नियंत्रित करता येतात. सरकारी धोरणे अधिक वास्तववादी बनतात. अन्नसुरक्षेसाठी हा अंदाज निर्णायक ठरतो.

आता पुढे काय करता येऊ शकते?
आज AI प्रामुख्याने सल्ला देणारे साधन आहे. पुढील टप्प्यात स्थानिक भाषांतील AI सल्ला प्रणाली अधिक मजबूत करता येतील, हवामान बदलाचे दीर्घकालीन मॉडेलिंग करून पिकांची रचना बदलण्याचे मार्ग सुचवता येतील.

माती आरोग्य कार्ड AI विश्लेषण एकत्र करून दीर्घकालीन शेती नियोजन करता येईल. एआय आधारित पाणी वाटप प्रणाली नदीखोरे पातळीवर वापरता येतील, हे प्रयोग केवळ संकल्पना नाहीत, काही भागांत ते आधीच यशस्वी ठरले आहेत.

- अजिंक्य देशमुख, (लोकमत, पुणे)

Web Title : कृषि में एआई: किसानों के लिए वरदान, क्या पारंपरिक तरीके बदल जाएंगे?

Web Summary : एआई डेटा-आधारित अंतर्दृष्टि प्रदान करके, फसल के पूर्वानुमान, रोग का पता लगाने, सिंचाई और संसाधन उपयोग में सुधार करके खेती को बढ़ाता है। यह बेहतर योजना और सूचित निर्णयों के माध्यम से किसानों, बाजार स्थिरता और खाद्य सुरक्षा को लाभान्वित करता है।

Web Title : AI in agriculture: A boon for farmers, transforming traditional methods?

Web Summary : AI enhances farming by providing data-driven insights, improving crop prediction, disease detection, irrigation, and resource use. It benefits farmers, market stability, and food security through better planning and informed decisions, but is a tool, not a replacement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.