Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : जिथं भूजल पातळी खालावली, तिथं विहीर पुनर्भरण करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : जिथं भूजल पातळी खालावली, तिथं विहीर पुनर्भरण करा, वाचा सविस्तर 

Latest News Agriculture News Vihir Punarbharan Well refilling increases groundwater level | Agriculture News : जिथं भूजल पातळी खालावली, तिथं विहीर पुनर्भरण करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : जिथं भूजल पातळी खालावली, तिथं विहीर पुनर्भरण करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : विहीर पुनर्भरण (Vihir Punarbharan) केल्याने भूजल पातळी वाढते आणि पाणीटंचाईवर मात करता येते. 

Agriculture News : विहीर पुनर्भरण (Vihir Punarbharan) केल्याने भूजल पातळी वाढते आणि पाणीटंचाईवर मात करता येते. 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : मागील काही वर्षात भूजल पातळी (Ground Water Level) अतिशय खाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे विहीर पुनर्भरण महत्वाचे झाले आहे. म्हणजे विहिरीतील पाण्याचे पुनर्भरण करणे होय. विहीर पुनर्भरण करण्यासाठी खड्डे खणून त्यात दगड, खडी, वाळू आणि कोळसा भरला जातो. विहीर पुनर्भरण (Vihir Punarbharan) केल्याने भूजल पातळी वाढते आणि पाणीटंचाईवर मात करता येते. 

पावसाचे पाणी विहीरीत सोडणे विहीर पुनर्भरण (Well Recharge) होय. यासाठी ओढा किंवा नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी, पावसाचा अपधाव यांचा वापर करता येतो. पावसाळ्यात विहीर भरल्याने विहिरीतील पाणी जमिनीत खोलवर मुरेल. ज्या जलस्तरातुन पाणी उपसले गेले होते, त्या जलस्तरात विहिरीतील पाणी (Water Refilling) शिरते. पावसाळयाच्या संपूर्ण हंगामात अशा प्रकारे पाणी भरलेल्या विहिरींच्या सर्वात जास्त खोलवर असलेल्या थरात भूजलसाठा पूर्ववत होउ शकतो. 

विहिरीत गाळ मिश्रित पाणी भरल्यास आणि विहिरीत गाळ असल्यास ज्या सूक्ष्म भेगांतून/छिद्रातून गाळयुक्त पाणी जलस्तरात वाहताना गाळामुळे ती छिद्रे/भेगा/फटी बंद पडण्याचा दाट धोका निर्माण होतो व जर ही छिद्रे बंद पडली तर विहीर बंद पडू शकते. म्हणून गाळविरहित पाणी विहीरीत सोडणे अत्यंत महत्वाचे आहे.

विहीर पुनर्भरण करण्याची पद्धत : 

  • विहिरीपासून काही अंतरावर आठ फूट लांब, सहा फूट रुंद आणि सहा फूट खोलीचा खड्डा खणावा.
  • या खड्ड्याच्या उताराकडे विहिरीच्या दिशेस सुमारे दहा फूट अंतरावर दुसरा एक चार फूट लांब, चार फूट रुंद आणि सहा फूट खोल आकारमानाचा खड्डा खणावा.
  • या खड्ड्यामध्ये दगड, खडी, वाळू आणि कोळसा यांचे थर भरावेत.
  • पहिला आणि दुसरा खड्डा एक चर खोदून एकमेकांस जोडावेत.

 

- कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक 

Web Title: Latest News Agriculture News Vihir Punarbharan Well refilling increases groundwater level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.