Lokmat Agro >शेतशिवार > नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज 

नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज 

Latest News agriculture News Nashik Zilla Parishad sells seeds at 50 percent subsidy, apply here | नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज 

नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज 

Agriculture News : यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

Agriculture News : यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : जिल्हा परिषद सेस फंड योजना (Nashik Zilha Parishad) सन 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर तूर 11.10 क्विंटल, मूग 10.24 क्विंटल, उडीद 10.54 क्विंटल व भुईमूग 157.80 क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती (Panchayat Samiti) कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद नाशिकचे कृषि विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असे आहेत योजनेचे निकष
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभार्थी निवड करून तूर, मूग, उडीद व भुईमूग या पिकांची लागवड करणाऱ्या सर्व इच्छुक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावार हंगाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक बियाण्यचा लाभ देण्यात येईल.
शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती कार्यालयात सादर करावा.
अर्जासोबत शेतकऱ्यांनी स्वत:चे / कुटुंबाचे नाव असलेले 7/12 व 8-अ चे अद्ययावत उतारे सादर करणे आवश्यक आहे.
एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 1 हेक्टरसाठी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात येईल. ( सदर बियाण्याचा लाभ देताना एका पेक्षा अधिक बियाणेच्या क्षेत्र मर्यादेत लाभ देय आहे.)
चालू आर्थिक वर्षात लाभ दिलेल्या शेतकऱ्याला दुबार लाभ दिला जाणार नाही
योजनेसाठी आवश्यक बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सातपूर, नाशिक व राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादित नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे बियाणे खरेदी करून पुरविण्यात येतील.
    
या योजनेत 50 टक्के अनुदानावर तूर, मूग, उडीद व भूईमुग बियाणे देण्यात येणार असून अनुदान वजा जाता उर्वरित 50 टक्के वसूल करावयाीच रक्कम गट स्तरावर  बियाणे वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसुल करून पुरवठादार संस्थेच्या नावे डी.डी/ धनादेश काढून कृषी विकास कार्यालयास पाठविण्यात यावा. तूर बियाण्याच्या 2 किलो बॅगसाठी पुर्ण दर रूपये 360 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रूपये 180 इतके आहे. तसेच 

पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रूपये 180 इतकी आहे. मुग बियाण्याच्या 2 किलो बॅगसाठी पूर्ण दर रूपये 390 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रूपये 195 इतके आहे. 

तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसुल करावयाची रक्कम रूपये 195 इतकी आहे. उडीद बियाण्याच्या 2 किलो बॅगसाठी पूर्ण दर रूपये 380 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रूपये 190 इतके आहे. 

तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रूपये 190 इतकी आहे. तर भुईमुग बियाण्याच्या 20 किलो बॅगसाठी पूर्ण दर रूपये 2 हजार 280 इतका असून पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के अनुदान रूपये 1 हजार 140 इतके आहे. 

तसेच पॅकिंग साईज प्रमाणे 50 टक्के वसूल करावयाची रक्कम रूपये 1140 इतकी आहे. तुर, मूग व उडीद बियाण्यासाठी पुरवठादार संस्था महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. नाशिक ही असून भुईमूग बियाण्यासाठी पुरवठादार संस्था राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्या. नाशिक ही आहे.

शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत?

Web Title: Latest News agriculture News Nashik Zilla Parishad sells seeds at 50 percent subsidy, apply here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.