Agriculture News : तुम्हाला कुक्कुटपालन, शेळीपालन, दृग्धव्यवसायाचे प्रशिक्षण किंवा इतर छोटे मोठे व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास नाशिकच्या महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्थेमाफॅत ६ नोव्हेंबर पासून १२ दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोफत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कृषी उद्यमी प्रशिक्षणांतर्गत
कृषी उद्यमी प्रशिक्षणांतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन, दृग्धव्यवसायचे मोफत प्रशिक्षण १० नोव्हेंबर पासून सूरू होणार आहे. या प्रशिक्षणात शेळी/गोट/पशूपालनचे विविध प्रकार, नियोजन, शेडचे बांधकाम नियोजन, खाद्य नियोजन व व्यवस्थापन, आजार व औषध व्यवस्थापन, माकॅटीग व माकॅटीग सर्वेक्षण, ग्राहक व्यवस्थापन, शासकीय व बँक कर्ज, अनुदान योजना, व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, युनिटला प्रत्यक्ष भेट, प्रशिक्षण कार्यक्रमात वही, पेन, वाचन साहित्य, ३ वेळ चहा, जेवण, रहाणे, टी-शर्ट मोफत मिळणार आहेत.
फास्ट फूड स्टाॅल उद्यमी प्रशिक्षणांतर्गत
फास्ट फूड स्टाॅल उद्यमी प्रशिक्षणांतर्गत २० चाटचे विविध प्रकार, चायनीज डिशेस, पदार्थ, वडापाव, पाववडे, व्हेज पूलावचे प्रकार, चहा, नास्ताचे प्रकार इत्यादी प्रशिक्षण. थेरी/प्रॅक्टिकल सह उद्योग व्यवसाय उभारणी, व्यक्तिमत्व व उद्योजकीय विकास, प्रत्यक्ष युनिट भेट, प्रकल्प भेट, शासकीय व बँकेचे विविध कर्ज व अनुदान योजना, माकॅटीग मॅनेजमेन्ट व सव्हॅक्षण, पॅकेजिंग इत्यादी विषयावर तज्ञामाफॅत मार्गदर्शन मिळणार आहे.
पात्रता :
शिक्षण ७ वी नापास/ पास
वय : १८ ते ४५ वर्षे
आवश्यक कागदपत्रे
शाळा सोडल्यास दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबूक, जात प्रमाणपत्र, २ फोटो.
कागदपत्र सोबत घेऊन येणे, ज्यांच्याकडे सर्व कागदपत्र असतील, त्यांनी घेऊन येणे, ज्यांच्याकडे १/२ कागदपत्र कमी असेल तरी चालेल, तसेच ज्यांच्याकडे जर दारिद्रय रेषेखालील कुटुंब दाखला, मनरेगा जॉब कार्ड, बचत गटातील सदस्य, किंवा घरकुल लाभार्थी असेल तर पूरावा सोबत घेऊन येणे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रशिक्षण १३ दिवसाचे मोफत असून १० ते ५ वाजेपर्यंत असेल, प्रशिक्षण कालावधीत ज्यांना रहायचे असेल ते राहू शकतात. ज्यांना येजा करणार असेल ते करू शकतात. अधिक माहितीसाठी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गोवर्धन ग्रामपंचायत जवळ, सेंट्रल बँक ऑफ ईडिंया समोर, गोवर्धन गाव, गंगापुर, नाशिक इथे संपर्क साधावा,
