Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > मध्य प्रदेशातून आले अन् जळगावच्या मातीत रुळले, आता शेतीतही भागीदारी!

मध्य प्रदेशातून आले अन् जळगावच्या मातीत रुळले, आता शेतीतही भागीदारी!

Latest News agriculture news Came from Madhya Pradesh and settled in soil of Jalgaon | मध्य प्रदेशातून आले अन् जळगावच्या मातीत रुळले, आता शेतीतही भागीदारी!

मध्य प्रदेशातून आले अन् जळगावच्या मातीत रुळले, आता शेतीतही भागीदारी!

Agriculture News : कधीकाळी मध्य प्रदेशातून (MP Farmers) आलेल्या आदिवासी बांधवांतील पावरा समाजाची श्रमशक्ती जळगावच्याही मातीत रुळली.

Agriculture News : कधीकाळी मध्य प्रदेशातून (MP Farmers) आलेल्या आदिवासी बांधवांतील पावरा समाजाची श्रमशक्ती जळगावच्याही मातीत रुळली.

जळगाव : शेतशिवारातल्या हंगामाला जपण्यासाठी गावागावातली श्रमशक्ती अशक्त झाली, म्हणून शेतकऱ्यांची श्वासकोंडी झाली. तशातच उपेक्षित आदिवासी समाजबांधव खान्देशात पाय रोवत गेला आणि शेतमाया पेरायला लागला. कालांतराने हजारो कुटुंबीय खान्देशाच्या शिवारात शेतकऱ्यांसोबत स्वप्नं पेरत गेले आणि कधीकाळी मध्य प्रदेशातून (MP Farmers) आलेल्या आदिवासी बांधवांतील पावरा समाजाची श्रमशक्ती जळगावच्याही मातीत रुळली.

गावागावातील मजूर वर्गाची संख्या ओसरत गेली आणि श्रमशक्ती अशक्त झाली. गावात असलेल्या मोजक्याच मजुरांनीही 'मर्जी'चा खेळ मांडला आणि शेतकऱ्यांचा हंगाम अडचणीत सापडायला लागला, तेव्हा शिरपूर, चोपडा, यावल, रावेर या मध्य प्रदेश सीमेवरच्या शेतकऱ्यांनी आदिवासी बांधवांना हाक दिली.

हातांना काम मिळतेय, म्हणून पावरा समाज बांधवही जळगावच्या (Jalgaon Farming) मातीत पाय रोवत गेला. बघता-बघता जिल्ह्यात सर्वदूर आदिवासी बांधवांची श्रमशक्त्ती स्थिरावली आणि पावरा बांधवांच्या 'पॉवर'मुळे स्थानिक मजुरांची मक्तेदारी मोडीत निघाली. त्यासोबतच पावरा समाजाच्या घामातून शेतसंपन्नता बहरून निघायला लागली.

काही शेतकऱ्यांनी भागीदारीत सुरू केली शेती
प्रतिदिन ३०० रुपयांच्या मजुरीने पावरा बांधव शेतोपयोगी कामासाठी उपलब्ध होतो. सकाळी ८ वाजेपासून शिवारात श्रमदान करणारा हा घटक दुपारी २ वाजेपर्यंत नियोजित कामे आटोपतो.

सध्या बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाची लागवड सुरू केली आहे. कापसाचे बियाणे रोवण्यासाठी या मजुरांकडून प्रति डबा २०० रुपयांची मजुरी द्यावी लागत आहे. एक मजूर दिवसभर दोन कापूस बियाण्यांचे डबे रोवतो. त्यामुळे प्रति मजूर ४०० रुपयांची मजुरी त्यांना द्यावी लागते.

काही शेतकऱ्यांनी आता या 'पॉवर'बाज बांधवांसोबत भागीदारीत शेती सुरू केली आहे. बियाण्यांसह खते, फवारणीची औषधे शेतमालकाने पुरवायची आणि संपूर्ण हंगामात पावरा कुटुंबीय कोळपणी, नागरणी, पेरणी, कापूस वेचणीसह सर्वच कामे उरकतात. हाताशी आलेले उत्पन्नातील निम्मे भाग या मजूर कुटुंबीयांना दिला जातो.

लेकरांची 'शाळा', जमीन मालकच घेतो पुढाकार
शेतशिवारातच वास्तव्यास असलेल्या या आदिवासी कुटुंबीयातील लेकरांना नजीकच्या जि.प. सह अन्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी जमीन मालक पुढाकार घेतो. या मुलांना शाळेतून ने-आण करण्यासाठीही मालक मदत करतो. त्यामुळे सकाळ सत्रात या लेकरांची शाळा भरते आणि दुपारनंतर बच्चे कंपनी शिवारातच मुक्त आनंदाचा पाढा वाचते.
 
 

Web Title: Latest News agriculture news Came from Madhya Pradesh and settled in soil of Jalgaon