नाशिक : बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) येथील सावतावाडी शिवारात वीज ट्रान्स्फॉर्मर खराब झाले होते. नवीन ट्रान्स्फॉर्मर मिळण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार होते. त्यामुळे सरपंच मच्छिंद्र खैरनार यांच्यासह शिष्टमंडळाने शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा यांची भेट घेऊन व्यथा मांडली. याची दखल घेत शर्मा यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत तातडीने नवीन ट्रान्स्फॉर्मर (Transfarmer) आणि सर्व साहित्य शेतकऱ्यांसाठी वेळेत उपलब्ध करून करून दिले.
बागलाण तालुक्यातील सटाणा परिसरातील (Satana Area) परिसरात प्रत्येक शेतकऱ्याने कांदा लागवड केलेली असून, कांद्याला दिवसरात्र करून पाणी द्यावे लागत आहे. कांदा आता ऐन जोमात आहे. आता जर पाण्याचा खंड पडला तर पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. त्यात ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होणार होते; परंतु शेतकरी मित्र (Shetkari Mitra) बिंदूशेठ शर्मा यांनी एका दिवसात नवीन ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली. यावेळी सरपंच मच्छिंद्र खैरनार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
रात्री बिबट्याचीही दहशत
दिवसा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतपिकांना रात्रीचे पाणी द्यावे लागते. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायचे कसे, असाही सवाल परिसरात उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी चोवीस तास तत्पर आहे. ट्रान्स्फॉर्मरसाठी किंवा शेतकऱ्यांच्या कोणत्याही शासकीय कामासाठी अडवणूक होत असेल तर त्यातून मार्ग काढण्यात येईल.
- बिंदूशेठ शर्मा, शेतकरी मित्र, सटाणा