Agricultural News : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच नाविन्यपूर्ण व औषधी पिकांकडे वळावे, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कस्तुरी भेंडी (Musk Okra), अश्वगंधा (Ashwagandha), सफेद मुसळी यांसारख्या विशेष पिकांची प्रात्यक्षिके राबविण्याची तयारी वाशिम जिल्ह्यात सुरू झाली आहे.(New Experiments)
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व नोंदणीकृत शेतकरी गटांनी २५ मे २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले आहे. (New Experiments)
कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यात कस्तुरी भेंडी, अश्वगंधा यांसारख्या नव्या व औषधी पिकांची प्रात्यक्षिके राबविण्याची तयारी सुरु झाली आहे. (New Experiments)
या योजनेअंतर्गत खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, तीळ, उडीद, मूग यांसारख्या पारंपरिक पिकांसोबतच कस्तुरी भेंडी, सब्जा, सफेद मुसळी, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींची प्रात्यक्षिकेही राबविली जाणार आहेत.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
* शेतकरी गट/उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र
* सदस्यांची यादी
* प्रस्तावित पिकांची माहिती
* लागवडीसाठी लागणाऱ्या क्षेत्राचा तपशील
प्राधान्य कुणाला?
या योजनेंतर्गत सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. एकाच गावातील किंवा शिवारातील २५ पेक्षा अधिक एकसारख्या पिकांची प्रात्यक्षिके राबवणे आवश्यक आहे.
या उपक्रमाचे फायदे
* नावीन्यपूर्ण पिकांबाबत शेतकऱ्यांना ज्ञान
* उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास
* मूल्यवर्धनाची संधी
* औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन
या पिकांची प्रात्यक्षिके राबविली जाणार!
खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, तीळ, उडीद, मूग (पारंपरिक कडधान्य व तेलबिया पिके), कस्तुरी भेंडी, सब्जा, सफेद मुसळी, अश्वगंधा (औषधी वनस्पती) या पिकांची प्रात्यक्षिके राबविली जाणार आहेत.
अर्ज कुठे पाठवायचा?
शेतकऱ्यांनी आपला अर्ज pdatmawashim@gmail.com या ईमेलवर पाठवू शकतात किंवा थेट आत्मा, वाशिम कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आधुनिक शेतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन 'आत्मा'च्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.