Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधितांना पंधरा दिवसांत मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले... 

पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधितांना पंधरा दिवसांत मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले... 

Latest news affected by the Purandar airport project will get compensation within fifteen days District Collector say | पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधितांना पंधरा दिवसांत मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले... 

पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधितांना पंधरा दिवसांत मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले... 

Purandar Airport : पुढील पंधरा दिवसांत या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Purandar Airport : पुढील पंधरा दिवसांत या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या ३ हजार एकर जमिनीसाठी ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसांत या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणारा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात येईल. ही एरोसिटी ही विमानतळाच्या शेजारीच उभारण्यात येणार असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.

डुडी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "गेल्या १० तारखेला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार राज्य सरकारने विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सहा हजार कोटींच्या निधीसाठी कर्ज उभारणीस मान्यता दिली आहे. हे कर्ज उभारणीसाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना केली असून त्यात एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांचा समावेश केला आहे. 

या तीन संस्थांमध्ये सिडकोचा सर्वाधिक भाग असणार असून या संदर्भातील अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी कर्ज उभारणीस आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर या निधीतून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे."

९६ टक्के क्षेत्राला संमती
या विमानतळासाठी केवळ मोजणीसाठी - संमती दिली होती. भूसंपादनाची संमती देण्यात आली नव्हती, असा काही - शेतकऱ्यांचा दावा होता. मात्र, भूसंपादनासाठीच जमिनीची मोजणी देण्यात येते. त्यामुळे एकूण क्षेत्रापैकी - सुमारे २६ टक्के क्षेत्राची संमती मिळालेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एरोसिटीतच परतावा
शेतकऱ्यांना देण्यात येणारा १० टक्के विकसित जमिनीचा परतावा हा एरोसिटीमध्येच देण्यात असून तीन हजार एकर क्षेत्रात विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याशेजारील क्षेत्रामध्ये एरोसिटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक काही जमीन ताब्यात आली आहे. काही जमीन अजून ताब्यात आलेली नसून त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांना एरोसिटीतच परतावा मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

 

जमीन एनए परवानगीसंदर्भातील जीआरबाबत अस्पष्टता, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, पण...

 

Web Title : पुरंदर हवाई अड्डा: 15 दिनों में भूमि मुआवजा, कलेक्टर का कहना है

Web Summary : पुरंदर हवाई अड्डा परियोजना से प्रभावित किसानों को पंद्रह दिनों के भीतर मुआवजा मिलेगा। भूमि अधिग्रहण के लिए ₹6,000 करोड़ का ऋण मंजूर। हवाई अड्डे के पास एरोसिटी में मुआवजा दिया जाएगा। 96% भूमि मालिकों की सहमति मिली, कलेक्टर जितेंद्र डुडी ने पुष्टि की।

Web Title : Purandar Airport: Land Compensation in 15 Days, Collector Says

Web Summary : Farmers affected by the Purandar airport project will receive compensation within fifteen days. ₹6,000 crore loan approved for land acquisition. Compensation will be given in the aerocity near the airport. 96% land owner's consent received, confirmed Collector Jitendra Dudi.