जळगाव : "पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्रगतीची नवी वाट शोधली आहे.
नईम हैदर बागवान असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतात केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता 'विविध पीक पद्धतीचा' (Multiple Cropping) यशस्वी अवलंब केला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नियोजनबद्ध शेतीतून नफा कसा मिळवता येतो, याचे उत्तम उदाहरण त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे."
पाचोरा येथील प्रगतिशील शेतकरी नईम हैदर बागवान यांनी विविध पीक पद्धतीचा अवलंब करत शाश्वत शेतीचे यशस्वी उदाहरण उभे केले आहे. नईम बागवान यांच्याकडे १२ एकर शेती असून त्यापैकी दोन हेक्टर क्षेत्रावर गादीवाफे तयार करून मल्चिंग पद्धतीने बोर पिकाची लागवड करण्यात आली आहे.
या बागेत त्यांनी पपईसह गिलके, दोडके, दुधी भोपळा, कारले, काकडी, ढेमसे, आळूची पाने, बीट, आले यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. याशिवाय त्यांनी एक एकर गहू, दोन एकर बाजरी, एक बिघा तूर, दहा आर मूग, दोन एकर फुलकोबी व बीट तसेच एक हेक्टरवर पपईची फळबाग केली आहेत.
हा भाजीपाला ते स्वतः पाचोरा बाजारपेठेत विकतात. थेट विक्रीमुळे त्यांना अधिक नफा मिळतो. त्यांना अंदाजे १ लाख ७६ हजार रुपये खर्च येतो. मात्र ते बागवान यांनी विविध पीक पद्धतीचा अवलंब करून वार्षिक ८ लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून हे सिद्ध केले आहे की, शेती हा तोट्याचा सौदा नाही. गरज आहे ती फक्त आधुनिक तंत्रज्ञानाची, चिकाटीची आणि नियोजनाची.
जमीन मालकीचा पुरावा नाही, 12 वर्ष जमिनीवर ताबा आहे, मालकी सांगता येते का, काय सांगतो कायदा?
