Lokmat Agro >शेतशिवार > फळे, भाजीपाला, दूध प्रक्रिया उद्योगासाठी 35 टक्के अनुदान मिळतंय, वाचा सविस्तर 

फळे, भाजीपाला, दूध प्रक्रिया उद्योगासाठी 35 टक्के अनुदान मिळतंय, वाचा सविस्तर 

Latest News 35 percent subsidy is being provided for fruits, vegetables, and milk processing industries, read in detail | फळे, भाजीपाला, दूध प्रक्रिया उद्योगासाठी 35 टक्के अनुदान मिळतंय, वाचा सविस्तर 

फळे, भाजीपाला, दूध प्रक्रिया उद्योगासाठी 35 टक्के अनुदान मिळतंय, वाचा सविस्तर 

Agriculture News : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान देण्यात येत असते. 

Agriculture News : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान देण्यात येत असते. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : केंद्र शासनाची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना' ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेमध्ये सर्व प्रकारच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान देण्यात येत असते. 

या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसाहाय्यता गटांना उद्योग सुरू करता येतो. पारंपरिक व स्थानिक उत्पादनांना यात प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थ्यांना घेता येतो. याबाबतची माहिती येवला तालुका कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी दिली आहे.

पात्रता काय आहे? 
योजनेंतर्गत अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे. शिक्षणाची अट नाही. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी. प्रकल्प किमतीच्या किमान १० टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी. 

काय काय सुरु करता येईल 
या योजनेंतर्गत फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, बेकरी उत्पादने, धान्ये प्रक्रिया, मासे व सागरी उत्पादने प्रक्रिया, तेलबीया प्रक्रिया, मांस पोल्ट्री उत्पादने, प्रक्रियाचा समावेश होतो.

कृषी विभागाशी संपर्क साधावा
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा वैयक्तिक लाभार्थी तसेच स्वयंसाहाय्यता बचत गटातील सदस्यां बीज भांडवलासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांच्याशी संपर्क साधावा.

उद्योजकांसाठी निकष
सामाईक पायाभूत सुविधाअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसाहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्था लाभ घेऊ शकतात.

शेतकरी कुटुंबातील तरुणांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारून स्वतःच्या पायावर उभे राहावे. कुटुंबाचा उद्धार करावा त्यासाठी कृषी विभाग सदैव पाठीशी उभे राहील.
- हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी, अंदरसूल.

Web Title: Latest News 35 percent subsidy is being provided for fruits, vegetables, and milk processing industries, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.