PM Kisan 19th Installment : देशभरातील अनेक शेतकरी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan 19th Installment) हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपयांचे 18 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. आता 19 वा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून 18 वा हप्ता PM Kisan Scheme)जारी केला होता. 18 व्या हप्त्याअंतर्गत 9.6 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारच्या आत्तापर्यंतच्या पॅटर्ननुसार पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता नवीन बजेटसह म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो.
केंद्र सरकार सुमारे 4 महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांचा हप्ता वितरित करत असते. अशा परिस्थितीत पुढील हप्ता फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार 1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बजेटच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेबाबत काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच आगामी 19 वा हप्ता वितरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
फेब्रुवारीमध्ये सर्व स्पष्ट होईल...
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये देते. अंदाजे चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जातो. या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे. याबाबत पुढील हफ्ता देताना याबाबत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. आगामी फेब्रुवारीमध्ये बजेट सादर होईल, यातून पीएम किसान योजनेच्या हफ्त्याबाबत स्पष्टता येईल.
कांदा पिकातील करपा व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी घ्या ह्या कमी खर्चातील फवारण्या