Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कृषी यांत्रिकीकारणासाठी 150 कोटींचा निधी; या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, वाचा सविस्तर 

कृषी यांत्रिकीकारणासाठी 150 कोटींचा निधी; या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, वाचा सविस्तर 

Latest News 150 crores fund for agricultural mechanization These farmers will get subsidy, read in detail | कृषी यांत्रिकीकारणासाठी 150 कोटींचा निधी; या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, वाचा सविस्तर 

कृषी यांत्रिकीकारणासाठी 150 कोटींचा निधी; या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, वाचा सविस्तर 

Krushi Yantrikikaran Yojana : गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Krushi Yantrikikaran Yojana : गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Krushi Yantrikikaran Yojana :  गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठी १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

सन २०२५-२६ या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी १५० कोटी इतका निधी आयुक्त, कृषि कार्यालयास अर्थसंकल्पिय अंदाज, वाटप व सनियंत्रण प्रणाली (बीम्स) वर वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर निधी सन २०२५-२६ करिता लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा, असे नमूद करण्यात आले आहे. 

सदरचा निधी राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरीत करणे बंधनकारक राहील. या योजनेंतर्गत लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलवरुन विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन करण्यात यावी. तसेच, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे जमा करावी. 

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि औजारे/यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषि औजारे/यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते.

 

वडिलोपार्जित जमिनीची समान वाटणी झाली नाही, अशावेळी काय करावे, वाचा संपूर्ण प्रक्रिया
 

Web Title : कृषि मशीनीकरण के लिए ₹150 करोड़ का फंड; किसानों को सब्सिडी

Web Summary : कृषि यांत्रिकीकरण योजना के लिए ₹150 करोड़ स्वीकृत, महाडीबीटी पोर्टल के माध्यम से चयनित किसानों को लाभ। कृषि मशीनरी के लिए सब्सिडी सीधे किसानों के आधार से जुड़े बैंक खातों में जमा की जाएगी। यह केंद्र सरकार की योजना के दिशानिर्देशों को लागू करता है।

Web Title : ₹150 Crore Fund for Farm Mechanization; Subsidies for Farmers

Web Summary : ₹150 crore is approved for the Krushi Yantrikikaran Yojana, benefiting farmers selected via the MahaDBT portal. Subsidies for agricultural machinery will be directly deposited into farmers' Aadhaar-linked bank accounts through the Public Financial Management System. This implements the central scheme's guidelines.