Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : पुढील चार वर्षांमध्ये एमएसपीने होणार डाळींची 100 टक्के खरेदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पुढील चार वर्षांमध्ये एमएसपीने होणार डाळींची 100 टक्के खरेदी, वाचा सविस्तर 

Latest News 100 percent procurement of pulses will be done at MSP in next four years, read in detail | Agriculture News : पुढील चार वर्षांमध्ये एमएसपीने होणार डाळींची 100 टक्के खरेदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : पुढील चार वर्षांमध्ये एमएसपीने होणार डाळींची 100 टक्के खरेदी, वाचा सविस्तर 

Agriculture News : डाळींच्या उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने सुरू केलेले हे एक महत्त्वाचे अभियान आहे.

Agriculture News : डाळींच्या उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने सुरू केलेले हे एक महत्त्वाचे अभियान आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रीमंडळाने डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाला मंजूरी दिली आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारे आणि डाळींच्या उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने सुरू केलेले हे एक महत्त्वाचे अभियान आहे. 2025-26 ते 2030-31 या सहा वर्षांच्या कालावधीत 11,440 कोटी रुपये खर्चाचे हे अभियान राबविले जाईल.

भारतीय पीकपद्धतीमध्ये आणि दररोजच्या आहारात डाळींना विशेष महत्त्व आहे. जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक तसेच ग्राहक देश भारत आहे. वाढते उत्पन्न आणि बदलती जीवनशैली यामुळे डाळींचा वापर वाढला आहे. तथापि देशांतर्गत उत्पादन ही वाढती मागणी पूर्ण करु शकत नसल्यामुळे डाळींच्या आयातीत 15-20 टक्के वाढ झाली आहे.   

क्लस्टर आधारित दृष्टिकोन अवलंबून संसाधनांचं कार्यक्षम वाटप, उत्पादकता वाढ व भौगोलिक वैविध्य साधलं जाईल. 100 टक्के खरेदी हमी : शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी मोठा निर्णय पुढील 4 वर्षे सहभागी राज्यांतील सर्व शेतकऱ्यांकडून तूर, उडीद व मसूर यांची 100% खरेदी पीएम-आशा योजनेअंतर्गत किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) केली जाईल. एनएएफईडी व एनसीसीएफ ही खरेदी करतील. तसेच जागतिक डाळ दरांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे.

याशिवाय, उत्तम दर्जाच्या बियाणांच्या उपलब्धतेच्या हमीसाठी पाच वर्षांचा बियाणे उत्पादन आराखडा राज्यांकडून तयार केला जाईल. भारतीय कषी संशोधन परिषद या बियाणे उत्पादनांची देखरेख करेल. राज्य आणि केंद्रिय स्तरावरील संस्था बियाणांची लागवड आणि उत्पादन करतील आणि बियाणे मान्यता, मागोवा व सर्वंकष नोंदी पोर्टल (साथी) बियाणे उत्पादनावर बारकाईने लक्ष ठेवेल.   

अधिकृत बियाण्याचे वितरण
सुधारित बियाण्यांच्या व्यापक उपलब्धतेसाठी कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना 126 लाख क्विंटल अधिकृत बियाण्याचे वितरण केले जाईल. याद्वारे 2030-31 पर्यंत डाळींचे लागवड क्षेत्र 370 लाख हेक्टर इतके करण्यात येईल. या अभियानाला पूरक असे जमिनीचा कस तपासणे, कृषी यांत्रिकीकरण, खतांचा संतुलित वापर, पीक संरक्षण यासारखे उपक्रम अमलात आणले जातील आणि कृषी संशोधन संस्था, कृषी विकास केंद्र व राज्यांच्या कृषी विभागाकडून सर्वोत्तम पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. 

तसेच 88 लाख मोफत बीज किट्स शेतकऱ्यांना दिल्या जातील. साथी पोर्टलद्वारे बियाण्यांच्या निर्मिती व वितरणावर लक्ष ठेवले जाईल. या अभियानांतर्गत मृदा आरोग्य योजना, कृषी यंत्रीकरण उपमिशन, संतुलित खत वापर, आयसीएआर, केव्हीके व राज्य विभागांच्या प्रात्यक्षिकांद्वारे सर्वोत्तम पद्धतींचे प्रचार-प्रसार करण्यात येणार आहेत.

25 लाख रुपयांपर्यंत अनुदान
डाळ क्षेत्र विस्तार व मूल्यसाखळी मजबुतीकरण अतिरिक्त 35 लाख हेक्टर क्षेत्र डाळींकरिता वापरण्याचे लक्ष्य आहे. यासाठी तांदुळ पिकानंतर रिकामी पडणारी शेतं व इतर जमीन वापरली जाणार आहे. आंतरपीक व पिक वैविध्यीकरणाला प्रोत्साहन दिलं जाईल. शेतकरी व बीज उत्पादकांसाठी संरचित प्रशिक्षणाद्वारे शाश्वत तंत्रज्ञान प्रसारित केलं जाणार आहे. पिकानंतरच्या नुकसानात कपात व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 1000 प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट्स उभारली जाणार आहेत. प्रत्येक युनिटसाठी कमाल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
 

Web Title : अगले चार वर्षों में दालों की एमएसपी खरीद 100% होगी

Web Summary : सरकार ने घरेलू दाल उत्पादन को बढ़ावा देने की योजना को मंजूरी दी, जिसका लक्ष्य आत्मनिर्भरता है। किसानों को चार साल तक तूर, उड़द और मसूर के लिए 100% एमएसपी मिलेगा। बीज वितरण और प्रसंस्करण इकाइयों को बढ़ाया जाएगा।

Web Title : Pulses' MSP Purchase to be 100% in Four Years

Web Summary : The government approved a plan to boost domestic pulse production, aiming for self-sufficiency. Farmers will receive 100% MSP for tur, urad, and masoor for four years. Seed distribution and processing units will be enhanced.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.