Onion Grading : कांद्याची प्रतवारी (Onion Grading) ही बाजारपेठेतील मागणी आणि कांद्याच्या आकारानुसार केली जाते. साधारण तीन प्रकारांत कांद्याचे वर्गीकरण केले जाते. उत्तम भावासाठी कांदा स्वच्छ, सुकलेला, आणि इजा न झालेला असावा, याचबरोबर प्रतवारी नेमकी कशी करावी, हे समजून घेऊयात...
कांदा प्रतवारी
- पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी. जोडकांदे, डेंगळे आलेले आणि चिंगळी कांदे वेगळे करावे.
- राहिलेले कांदे गोळा करून सावलीत ढीग घालावा आणि तो तिथे १० ते १२ दिवस राहू द्यावा.
- आपल्या देशात कांद्याची प्रतवारी मजुरांकरवी केली जाते.
- सर्वसाधारण विशेष मोठे कांदे (६ सें.मी. व्यास व वरचे), मध्यम (४ ते ६ सें.मी. व्यासाचे) आणि लहान (२ ते ४ सें.मी. व्यासाचे) अशा प्रकारे कांद्याची प्रतवारी केली जाते.
- बाजारपेठांच्या आवश्यकतेनुसार प्रतवारी करून कांदा योग्य पॅकिंगमध्ये बाजारात पाठविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक चांगला भाव मिळू शकतो.
- कांद्याची प्रतवारी मजुरांच्या सहाय्याने करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक कांदा हाताळावा लागल्यामुळे खर्च वाढतो.
- शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे प्रतवारी करतीलच याची खात्री नसते.
- अशा परिस्थितीत हाताने किंवा छोट्या मोटारीच्या सहाय्याने चालविता येणाऱ्या सुटसुटीत व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या प्रतवारी यंत्राची गरज भासते.
- या सर्व अडचणींचा विचार करून कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने हस्तचलित तसेच स्वयंचलित कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले आहे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
एकाच जमिनीत कांदा लागवड करताय, बुरशी वाढली, उत्पादनात घट झाली, वाचा सविस्तर
