Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Amba Market : गुजरात, केरळ केशरला भारी ठरतोय देवगडचा हापूस, आंबा मार्केटमध्ये दर कसे आहेत? 

Amba Market : गुजरात, केरळ केशरला भारी ठरतोय देवगडचा हापूस, आंबा मार्केटमध्ये दर कसे आहेत? 

Latest Nes Gujarat, Kerala saffron and Devgad's Hapus, see per kilo prices mango market | Amba Market : गुजरात, केरळ केशरला भारी ठरतोय देवगडचा हापूस, आंबा मार्केटमध्ये दर कसे आहेत? 

Amba Market : गुजरात, केरळ केशरला भारी ठरतोय देवगडचा हापूस, आंबा मार्केटमध्ये दर कसे आहेत? 

Amba Market : आंब्यांच्या जातींनी बाजार सजला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Amba Market : आंब्यांच्या जातींनी बाजार सजला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

जळगाव : शहरातील बाजारपेठेत विविध आंब्यांच्या जातींची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने सध्या आंबा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. हापूस, केशर, दशहरी, बदामी आणि लालबाग या प्रमुख आंब्यांच्या जातींनी बाजार सजला असून, हंगामाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

आवक यंदा सुरुवातीलाच वाढल्याने अनेक जण अक्षय तृतीयेपूर्वीच आंब्याची चव चाखताना दिसत आहेत. सध्या बाजारात हापूस व केशर आंबा सुमारे ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, लालबाग आंबा २०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. दशहरी, तोतापुरी, बदामी या आंब्यांनाही बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः आमरस तयार करण्यासाठी या जातींची मागणी वाढली आहे.

यंदा गावरान आंब्यांचा सुकाळ
पूर्वी गावरान आंब्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत असत. मात्र आता विविध जाती सहज उपलब्ध होत असल्याने प्रतीक्षा काहीशी कमी झाली आहे. तरीही गावरान आंब्याची चव वेगळी असल्याने त्याची मागणी कायम आहे. यंदा गावरान आंब्यांचे उत्पादनही चांगले असल्याने ग्राहकांना गावरान आमरसाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

अक्षय तृतीयेला गावरान आमरस दुर्मिळ
लालबाग आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने त्याची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा गावरान आंब्यांची फळधारणा उशिरा होत असल्याने अक्षय तृतीयेच्या सणाला गावरान आमरस उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अनेक नागरिक आतापासूनच हापूस व दशहरी आंब्यांची खरेदी करून आमरस तयार करण्याकडे वळले आहेत.

असे आहेत दर

  • गुजरात केशर - ३०० रुपये किलो 
  • केरळ केशर - १८० रुपये किलो 
  • लालबाग - २०० रुपये किलो 
  • बदामी - १५० रुपये किलो 
  • गुलाब खास - २०० रुपये किलो 
  • देवगड-रत्नागिरी हापूस - १२ नग ८००
  • केरळ हापूस - ३०० रुपये किलो 
  • बैंगन फल्ली - २०० रुपये किलो 

 

 

 पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज नाही, काय आहे नवीन निर्णय

 

Web Title : देवगड हापुस ने गुजरात, केरल केसर को हराया; यहाँ बाजार दरें।

Web Summary : जलगाँव बाजार में आमों की भरमार। हापुस और केसर ₹300/किलो। देशी आमों की मांग अधिक, अक्षय तृतीया पर उपलब्धता संदिग्ध। लालबाग लोकप्रिय। देवगड हापुस (12) की कीमत ₹800 है।

Web Title : Devgad Hapus mango beats Gujarat, Kerala Kesar; Market rates here.

Web Summary : Jalgaon market floods with mango varieties. Hapus and Kesar sell at ₹300/kg. Demand for local mangoes remains high, but availability for Akshay Tritiya is doubtful. Lalbag is popular. Devgad Hapus (12) costs ₹800.