Lokmat Agro >शेतशिवार > अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात बोगस लाभार्थी, नाशिक, अहिल्यानगरातील प्रकार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात बोगस लाभार्थी, नाशिक, अहिल्यानगरातील प्रकार

Latest Ndews Bogus beneficiaries in Annasaheb Patil Economic Development Corporation | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात बोगस लाभार्थी, नाशिक, अहिल्यानगरातील प्रकार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात बोगस लाभार्थी, नाशिक, अहिल्यानगरातील प्रकार

Agriculture News : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे ऑनलाइन प्रक्रिया राबविणारे एकमेव महामंडळ आहे.

Agriculture News : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे ऑनलाइन प्रक्रिया राबविणारे एकमेव महामंडळ आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा (Annasaheb Patil Mahamandal) लाभ घेताना नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात सात ते आठ बोगस लाभार्थी आढळून आले असून, नॉन मराठा लाभार्थ्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेटवर खोडाखोड करून लाभ घेतला आहे.

याप्रकरणी सखोल तपास करावा यासाठी दोघा जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे ऑनलाइन प्रक्रिया राबविणारे एकमेव महामंडळ आहे. यापूर्वीच्या काही महामंडळांचा इतिहास पाहिला तर लाखो बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात पहिले सात, आठ लाभार्थी बोगस आढळून आल्याने त्याची व्याप्ती वाढू नये, 

खऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही खबरदारी घेत ही बाब पोलिसांना कळवून खोट्या लाभार्थ्यांना कडक शासन करावे यासाठी कारवाई करण्याचे सूचित केले असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

यात लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया करणाऱ्या सीएससी सेंटरवरही कारवाई करण्याचे संकेत नरेंद्र पाटील यांनी दिले. राज्यात दीड लाख लाभार्थ्यांना महामंडळाने दोन हजारहून अधिक कोटींचे कर्ज दिले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

विभागात ३६ हजार ४७३ लाभार्थ्यांना कर्ज
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत महामंडळाच्या माध्यमातून ३६ हजार ४७३ लाभार्थ्यांना २७९८ कोटींचे कर्ज दिले असून २५३ कोटींचा व्याजाचा परतावा दिला असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. तर राज्यात १२ हजार कोटींचे कर्ज व १२२२ कोटींचा व्याज परतावा लाभार्थ्यांना दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Mahadbt Lottery List : महाडीबीटीवर फळबाग लागवड योजनेची निवड यादी आली, तुमचं नाव चेक करा!

Web Title: Latest Ndews Bogus beneficiaries in Annasaheb Patil Economic Development Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.