Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक पदांचा निकाल जाहीर; इथे पहा विभागनिहाय नावांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:25 IST

bhukarmapak result 2026 भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आला.

भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आला.

भूमिअभिलेख विभागाच्या 'महाभूमी' या संकेतस्थळावर तसेच संबंधित उपसंचालक, भूमिअभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी राज्यातून ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी आऑनलाइनपरीक्षा दिली.

ही परीक्षा १३ व १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती.

या निवड यादीतील संवर्गनिहाय पात्र उमेदवारांना नियुक्तीसाठी कागदपत्रांची छाननी उपसंचालक, भूमिअभिलेख कार्यालयामार्फत करण्यात येईल.

विभागनिहाय नावांची यादी पाहण्यासाठीनिकाल - पुणे विभाग निकाल - मुंबई विभागनिकाल - छत्रपती संभाजीनगर विभागनिकाल - नाशिक विभागनिकाल - नागपूर विभागनिकाल - अमरावती विभाग

अधिक वाचा: Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं; कोणत्या योजनेला किती निधी?

English
हिंदी सारांश
Web Title : Land Records Department Surveyor Post Result Declared; Check Division-wise List

Web Summary : The Land Records Department announced the surveyor post exam results for 903 positions. Results are available on the 'Mahabhumi' website and at relevant offices. Over 30,000 candidates appeared for the online exam held in November 2025. Document verification for selected candidates will be conducted by the Deputy Director, Land Records Office.
टॅग्स :राज्य सरकारपरीक्षामहसूल विभागऑनलाइनपुणेमुंबईनाशिकनागपूरअमरावती