Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रिंगरोडसाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा, 33 गुंठे जमिनीची थेट खरेदी, शेतकऱ्याला किती पैसे मिळाले? 

रिंगरोडसाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा, 33 गुंठे जमिनीची थेट खरेदी, शेतकऱ्याला किती पैसे मिळाले? 

Land acquisition for ring road begins, direct purchase of 33 gunthas of land, how much money did the farmer get per hectare? | रिंगरोडसाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा, 33 गुंठे जमिनीची थेट खरेदी, शेतकऱ्याला किती पैसे मिळाले? 

रिंगरोडसाठी भूसंपादनाचा श्रीगणेशा, 33 गुंठे जमिनीची थेट खरेदी, शेतकऱ्याला किती पैसे मिळाले? 

Nashik Ringroad : शेतकऱ्यांना २५ टक्क्यांचा अतिरिक्त मोबदला शासनाकडून दिला जात आहे. 

Nashik Ringroad : शेतकऱ्यांना २५ टक्क्यांचा अतिरिक्त मोबदला शासनाकडून दिला जात आहे. 

नाशिक : सिंहस्थासाठी नाशिक जिल्ह्यातून ६६ किमीचा रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून थेट खरेदीद्वारे भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक नोंदणी कार्यालयात मानोरी येथील महिला शेतकऱ्याची ३३ गुंठे जिरायती जमीन खरेदीची नोंदणी प्रक्रिया पार पडली. जमीनमालकाला एक कोटी ९० लाख रुपये प्रतिहेक्टर दराने ३ कोटी १९ लाख ६५ हजार ४२० रुपयांचा मोबदला दिला.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून ६६ किमीचा रिंगरोड शासनाकडून विकसित करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून गती दिली जात आहे. स्वतःहून संमती देत थेट खरेदी दिल्यास शेतकऱ्यांना २५ टक्क्यांचा अतिरिक्त मोबदला शासनाकडून दिला जात आहे. 

दिंडोरीतील दोन शेतकऱ्यांनी संमती दर्शविली असून, इंदुबाई गणपत गायकवाड यांच्या मालकीच्या येथील गट क्रमांक १११/३ मधील एकूण ०१.६० हेक्टर क्षेत्रापैकी ३३.५० गुंठे जमीन थेट खरेदीद्वारे संपादित केली आहे. या जिरायती प्रकारच्या शेतजमीनीच्या खरेदीचा व्यवहार पार पडला. 

त्यांनी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला (एमएसआयडीसी) खरेदी खत लिहून दिले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते त्यांना पहिल्या खरेदीचा धनादेश देत जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. 

थेट खरेदी प्रक्रिया काय...?
भूसंपादन कायद्याद्वारे सक्तीने भूसंपादन आणि स्वेच्छेने संमती दर्शवून थेट खरेदीद्वारे भू-संपादन अशा दोन पद्धतीचा अवलंब जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. थेट खरेदीद्वारे संमती दिल्यास शासनाकडून २५ टक्के प्रमाणे वाढीव मोबदला भूधारकाला दिला जातो. सक्त्तीने खरेदी केल्यास हा मोबदला मिळत नाही.

६३.९३ लाखांचा वाढीव लाभ
प्रतिहेक्टर १ कोटी २० लाख रुपये असा दर लागू करण्यात आला. त्यानुसार गायकवाड यांच्या क्षेत्रासाठी ६३ लाख ६५ हजार रुपये बाजारमूल्य ठरविण्यात आले. यामध्ये विहीर, पाइपलाइन आदी बाबींसाठी ५६ हजार १६८ रुपये अतिरिक्त देण्यात आले. तसेच नियमानुसार १०० टक्के दिलासा रक्कम व इतर घटक धरून एकूण मोबदला २ कोटी ५५ लाख ७२ हजार ३३६ रुपये इतका झाला होता. 

त्यावर थेट खरेदीद्वारे शासनाने दिलेल्या २५ टक्के वाढीव मोबदल्याच्या लाभाने अंतिम देय रक्कम ३ कोटी १९ लाख ६५ हजार ४२० रूपये त्यांच्या बैंक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आली. बेट खरेदी प्रक्रियेला संमती दिल्यामुळे त्यांना ६३ लाख २३ हजार ८४ रुपयांचा वाढीव लाभ मिळाला आहे.
 

Web Title : नाशिक रिंग रोड के लिए भूमि अधिग्रहण शुरू; किसान को मुआवजा।

Web Summary : कुंभ मेले से पहले नासिक जिले में 66 किमी रिंग रोड के लिए भूमि अधिग्रहण शुरू हो गया है। एक किसान को सीधे खरीद के माध्यम से 33 गुंठा जमीन के लिए ₹3.19 करोड़ मिले, जिससे उसे 25% अतिरिक्त मुआवजे का लाभ हुआ।

Web Title : Land acquisition begins for Nashik Ring Road; farmer compensated.

Web Summary : Nashik district starts land acquisition for a 66 km ring road ahead of the Kumbh Mela. A farmer received ₹3.19 crore for 33 Guntha land via direct purchase, benefiting from a 25% extra compensation.