Join us

Lakhpati Didi Scheme: राज्यात 'या' जिल्ह्यातील लखपती दीदींची सक्षम घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:20 IST

Lakhpati Didi Scheme : महाराष्ट्रातील महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने 'उमेद' आणि स्वयं-सहाय्यता बचतगट चळवळीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महाराष्ट्रातीलमहिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने 'उमेद' आणि स्वयं-सहाय्यता बचतगट चळवळीने (Movement) राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २५४ महिला बचतगट कार्यरत असून, तब्बल १७ लाख ७ हजार २४७ महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. 'लखपती दीदी' मध्ये राज्यात नाशिक जिल्हा आघाडीवर असून, येथे ९२,६३३ महिला 'लखपती दीदी' (Lakhpati Didi) झाल्या आहेत.

आर्थिक साक्षरतेसह महिला बचतगटांनी नाशिकमध्ये मोठे यश मिळवले आहे. ३८,०३६ महिलांनी 'लखपती दीदी' म्हणून वाशिम जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केली.

आर्थिकदृष्ट्या सक्षम

बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, त्यांच्यात आत्मविश्वास वाढत आहे. त्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.  

जीवनशैलीत बदल

* राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बचतगटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे.

* हातमाग, ग्रामीण उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, पशुपालन, मसाले उत्पादन, खादी उत्पादने, टेलरिंग यासारख्या व्यवसायांमध्ये महिलाआघाडीवर आहेत.

* राज्यात इतर जिल्ह्यांमध्येही महिलांनी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने भरीव वाटचाल केली.

हे ही वाचा सविस्तर : LIC Bima Sakhi Yojana: लाडक्या बहिणींना मिळणार विमा सखीतून रोजगार कसा ते जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलामहिला आणि बालविकासशेतकरीसरकारी योजनामहाराष्ट्रवाशिमनाशिक