Lokmat Agro >शेतशिवार > गुजरातमधील भरुच शेंगदाण्याला टक्कर देण्यासाठी कोंकण कृषी विद्यापीठाचा नवीन वाण; वाचा सविस्तर

गुजरातमधील भरुच शेंगदाण्याला टक्कर देण्यासाठी कोंकण कृषी विद्यापीठाचा नवीन वाण; वाचा सविस्तर

Konkan Agricultural University's new variety to compete with Bharuch peanuts in Gujarat; Let's see in detail | गुजरातमधील भरुच शेंगदाण्याला टक्कर देण्यासाठी कोंकण कृषी विद्यापीठाचा नवीन वाण; वाचा सविस्तर

गुजरातमधील भरुच शेंगदाण्याला टक्कर देण्यासाठी कोंकण कृषी विद्यापीठाचा नवीन वाण; वाचा सविस्तर

गोरगरिबांचा 'बदाम' म्हणून ओळख असलेला शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. सद्यःस्थितीत गुजरातमधील भरुच या शेंगदाण्याला मोठी मागणी आहे.

गोरगरिबांचा 'बदाम' म्हणून ओळख असलेला शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. सद्यःस्थितीत गुजरातमधील भरुच या शेंगदाण्याला मोठी मागणी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मेहरून नाकाडे
रत्नागिरी: गोरगरिबांचा 'बदाम' म्हणून ओळख असलेला शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. सद्यःस्थितीत गुजरातमधील Bharuch Shengdana भरुच या शेंगदाण्याला मोठी मागणी आहे.

या शेंगदाण्याला टक्कर देईल असे नवीन वाण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भातसंशोधन केंद्राने विकसित केले आहे. या नव्या वाणाचे संशोधन पूर्ण झाले असून, उत्पादकतेची चाचणी स्थानिक शेतांमध्ये घेण्यात येत आहे.

भाजलेला, उकडलेला वा कच्चा, कोणत्याही पद्धतीने शेंगदाणा खायला आवडतो, मात्र, ज्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण पेक्षा ४५% अधिक असेल ते खायला कडवट लागतात. तेलाचे प्रमाण कमी असलेला दाणा गोडसर व चविष्ट असतो.

शेतात उत्पादकतेची चाचणी सुरू
१) टपोरा, चवीला गोड, कुरकुरीत शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो.
२) गुजरात येथील भरुचा हा शेंगदाणा तसा असल्याने खाण्यासाठी सर्रास वापरला जातो.
३) तेलासाठी भात संशोधन केंद्राने 'कोकण टपोरा' व 'कोकण भूरत्न' हे दोन वाण आधीच उपलब्ध करून दिले आहेत.
३) मात्र, खास खाण्यासाठीच्या शेंगदाण्याचे संशोधन केले आहे.
४) हे वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होणारे आहे.
५) यात तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्के असेल.
६) सध्या शेतात उत्पादकतेची चाचणी सुरू आहे.

संशोधन पूर्ण झाले असून, आता उत्पादकता मोजण्यासाठी स्थानिक शेतकयांच्या शेतात प्रयोग सुरू आहेत. नवीन वाण तेलाऐवजी खाण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. - डॉ. विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव (जि. रत्नागिरी)

अधिक वाचा: Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर

Web Title: Konkan Agricultural University's new variety to compete with Bharuch peanuts in Gujarat; Let's see in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.