Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी येणार खात्यात? जाणून घ्या

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी येणार खात्यात? जाणून घ्या

know the date of 15th instalment of PM Kisan samman | पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी येणार खात्यात? जाणून घ्या

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी येणार खात्यात? जाणून घ्या

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (pm kisan samman) १५ वा हप्ता मिळण्याची लवकरच शक्यता आहे. हा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेक लाभार्थींना उत्सुकता आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (pm kisan samman) १५ वा हप्ता मिळण्याची लवकरच शक्यता आहे. हा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेक लाभार्थींना उत्सुकता आहे.

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता मिळणार की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची लाभार्थी यादी पाहणे महत्वाचे असते. तुम्ही लाभार्थी यादी कशी पाहू शकता ते जाणून घेऊ या.

१. पीएम किसान योजनेअंतर्गत, लाभार्थी यादीतील हप्त्याबाबत तुमचे स्टेटस काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता.
२. त्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
३. वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला येथे लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
४. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
५. त्यानंतर तुम्ही आवश्यक माहिती भरल्यावर तुम्हाला Get Details वर क्लिक करावे लागेल.
६.आता तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तुम्ही पाहू शकाल. 
७. तुमचे नाव या यादीत असणे म्हणजे तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळू शकतो.

शेतकऱ्यांना १५ वा हप्ता कधी मिळणार? 
पीएम किसान योजनेच्या १५व्या हप्त्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. काही माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्यांनुसार हा हप्ता येत्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो. मात्र, अद्याप पीएम किसान पोर्टलवर याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: know the date of 15th instalment of PM Kisan samman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.