चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ०.५४ पैसे आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून केवळ १ हजार ८३३ गावांत खरीप पिके घेतली जातात.
त्यापैकी १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यामध्ये ९४२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी, तर ५० पैशापेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ८४६ आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दर्शवते दुष्काळसदृश परिस्थिती
पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्यास दुष्काळसदृश परिस्थिती दर्शवते. कर्जमाफी व पीक विमा योजनांसाठी ही पैसेवारी महत्त्वाची ठरते. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी म्हणजे त्या हंगामातील भरपाईसाठी शासनाने जाहीर केलेली आकडेवारी होय. पिकांच्या उत्पादनाचे नुकसान
तालुकानिहाय पैसेवारी
चंद्रपूर (१०१ पैकी ८६ गावे ) - ०.५३
बल्लारपूर (३५ पैकी ३२ गावे) - ०.४५
राजुरा (१११ पैकी ११० गावे) -०. ४८
कोरपना (११३ पैकी ११३ गावे )- ०. ४७
जिवती (८३ पैकी ७५ गावे) - ०. ५८
गोंडपिपरी (९८ पैकी ९८ गावे) -०.४७
पोंभूर्णा (७१ पैकी ७१ गावे) - ०. ५४
मूल (११३ पैकी १११ गावे) - ०.५८
सावली (१११ पैकी १११ गावे) - ०. ६९
सिंदेवाही (११५ पैकी ११३) - ०. ५६
नागभीड (१३८ पैकी १३८ गावे) - ०.६५
ब्रह्मपुरी (१४० पैकी १३८) - ०. ६२
चिमूर (२५९ पैकी २५८ गावे) -०.४७
वरोरा (१८६ पैकी १८५ गावे) -०. ४७
भद्रावती (१६२ पैकी १४९) - ०. ४८
