कोल्हापूर : 'कोल्हापुरी' गुळाला साता समुद्रापार मागणी आहे. पण गेल्या वर्षभरात निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे.
कोल्हापूरच्या तुलनेत कर्नाटकातील गूळ कमी दराने मिळत असल्याने निर्यातीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेत गुळाची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत.
कोल्हापुरी गुळाला भारतासह परदेशात चांगली मागणी असते. 'कोल्हापुरी' गुळाला लंडन, कॅनडा, अमेरिका, दुबई, मस्कतसह आखाती देशात खूप मागणी आहे. मुंबईचे व्यापारी 'कोल्हापुरी' गुळाची खरेदी करून या देशात पाठवितात.
नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या काळात गुळाची मागणी वाढते. यादरम्यानच निर्यातीला गती येते. पण गेल्या दोन वर्षांपासून निर्यात हळूहळू कमी होऊ लागली आहे.
रस कमी, साखर जास्त◼️ गुळाचा उत्पादन खर्च कर्नाटकात व कोल्हापुरात जवळपास सारखाच येतो. मात्र, दोन्ही ठिकाणच्या गुळाच्या दरात एवढी तफावत कशी? कर्नाटकात रस कमी आणि साखर अधिक वापरली जाते.◼️ आपल्याकडे ८० टक्के रस आणि २० टक्के साखरेचे प्रमाण असल्याने आपला उत्पादन खर्च तुलनेत अधिक असतो. त्याचा परिणाम गुळाच्या दरावर होत असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कर्नाटकी गूळ प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी स्वस्त'कोल्हापुरी' आणि 'कर्नाटकी' गुळाच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ४०० चा फरक आहे. निर्यात खर्च आणि परदेशात मिळणारा दर पाहता, मुंबईतील व्यापाऱ्यांची कर्नाटकीलाच अधिक पसंती दिसते.
गुळाचे उत्पादन असे..२० टक्के साखर व ८० टक्के रस हे प्रमाण कोल्हापुरात असल्याने आपला उत्पादन खर्च तुलनेत अधिक असतो.
वर्षाला हजार टन निर्यात◼️ मुंबईतील व्यापाऱ्यांकडून वर्षभरात साधारणता एक हजार टन गुळाची निर्यात होते. मात्र, दर आणि टिकाऊपणा यामुळे हळूहळू निर्यात कमी होत आहे.◼️ पूर्वी २० टक्के कोल्हापुरी गूळ, तर १० टक्के नीरा बारामती, कर्नाटकातील गुळाची निर्यात व्हायची. पण आता ८० टक्के कर्नाटकी गूळ निर्यात होऊ लागल्याचे व्यापारी सांगतात.
'कोल्हापुरी' गुळाची मागणी कमी झालेली नाही. थेट निर्यात येथून होत नसल्याने त्याचा अंदाज येत नाही. मुंबईतील व्यापाऱ्यांना बारीक कणीचा गूळ लागतो. - तानाजी दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर बाजार समिती
अधिक वाचा: बारमाही गुऱ्हाळं चालू; रोपवाटिकेतील कांड्याबरोबरच नऊ महिन्यांच्या कोवळ्या उसाचे पण होतेय गाळप
Web Summary : Kolhapur jaggery exports decline as cheaper Karnataka jaggery gains preference. Lower production costs in Karnataka, due to higher sugar usage, impact Kolhapur's competitiveness. Mumbai traders favor Karnataka jaggery due to price differences.
Web Summary : कोल्हापुरी गुड़ का निर्यात घटा, क्योंकि सस्ता कर्नाटकी गुड़ पसंद किया जा रहा है। कर्नाटक में कम उत्पादन लागत, चीनी के अधिक उपयोग के कारण, कोल्हापुर की प्रतिस्पर्धात्मकता पर प्रभाव पड़ता है। मुंबई के व्यापारी कीमत के अंतर के कारण कर्नाटकी गुड़ को पसंद करते हैं।