Kapus Kharedi : सीसीआयकडून (CCI) यावर्षी हमीभावाने कापूस खरेदी (Kapus Kharedi) ही बीड जिल्ह्यात व तालुक्यात करण्यात आलेली आहे. काही दिवस सर्व्हर डाऊन असल्याने मध्यंतरी खरेदी थांबली होती.
त्यातच आता सीसीआयकडून कापूस खरेदीची (Kapus Kharedi) शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कापूस हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये सीसीआयकडून चालू असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बीडच्या कार्यक्षेत्रातील खरेदी ही १२ मार्च २०२५ पासून बंद होणार आहे.
खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयमध्ये (CCI) चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढत आहेत. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे.
खरेदीची शासकीय तारीख ही १५ मार्च २०२५ असली तरी १३, १४, १५ तीन दिवस हे सुटीचे आहेत. त्यामुळे या बाबींची नोंद घेत १२ मार्चपूर्वी कापूस विक्री करावी. ज्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री करावयाचा राहिलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी एमआयडीसीमधील सिद्धी ॲग्रो, बहीरवाडी येथे कापूस विक्रीसाठी आणावा.