Join us

Javas Sheti : पैसे देणारे पीक जवस; तरीही शेतकऱ्यांची पाठ का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:25 IST

Linseed Farming : तेलबियांमध्ये समावेश असलेल्या तसेच आयुर्वेदामध्येही ज्या पिकाला महत्त्व आहे, अशा जवसाच्या पिकाकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

तेलबियांमध्ये समावेश असलेल्या तसेच आयुर्वेदामध्येही ज्या पिकाला महत्त्व आहे, अशा जवसाच्या पिकाकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

जवसाला बाजारात चांगला दरही मिळतो, असे असूनदेखील जिल्ह्यातून हे पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ हेक्टरवर पेरा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवस पेरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. रब्बी हंगामात शेतकरी घरात चटणीसाठी वापरता येतील; अथवा पुढील वर्षासाठी घरचे बियाणे मिळेल, या उद्देशाने एक किंवा दोन तिफण जवसाची पेरणी करतात. जिल्ह्यात यावर्षी केवळ १९ हेक्टरवर जवसाचा पेरा झाला आहे.

जवसाला बाजारात ८ हजार रुपये दर

मानवाच्या रोजच्या आहारात जवसाचा वापर वाढविण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे खऱ्या जवसाची औषधी दुकानातही विक्री होताना दिसते. किराणा दुकानावर जवस १०० रुपये किलो दराने विक्री केले जाते, तर होलसेल बाजारात ८ ते ९ हजार रुपये प्रति क्चेिटल, असा जवसाला दर मिळतो.

कोणत्या तालुक्यात किती पेरा?

तालुकापेरा (हेक्टरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर०० 
पैठण३ हेक्टर 
गंगापूर०० 
वैजापूर०० 
कन्नड०० 
खुलताबाद०० 
सिल्लोड१६ 
सोयगाव०० 
फुलंब्री०० 

सर्वाधिक लागवड सिल्लोड तालुक्यात

• जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १६ हेक्टर क्षेत्रावर जवसाची पेरणी झाली.

• विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांची जिल्ह्याची जवस पेयाची सरासरी १४ हेक्टर आहे.

जिल्ह्यातील जवस पिकाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आजपर्यंतच्या पीक पेऱ्याची आकडेवारी पाहिल्यास जवसाची जिल्ह्याची १६ सरासरी केवळ १४ हेक्टर आहे. यावर्षी मात्र प्रथमच जवसाचा पेरा १९ हेक्टरपर्यंत वाढला आहे. शेतकरी केवळ एक, दोन तिफण जवसाचा पेरा करतात. - प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक. 

हेही वाचा : Profitable Farming Formula : एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उत्पादनात होईल वाढ; आर्थिकतेची भरभराट

टॅग्स :शेती क्षेत्रलागवड, मशागतपीकपेरणीशेतीशेतकरीछत्रपती संभाजीनगरमराठवाडा