lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात वाढ

रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात वाढ

Increase in procurement rate of silk cocoon for production of mulberry silk seed required | रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात वाढ

रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात वाढ

शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे निर्माण करण्यात येत असलेले रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात सुधारणा.

शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे निर्माण करण्यात येत असलेले रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात सुधारणा.

शेअर :

Join us
Join usNext

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी आणि बाजारातील वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार २० लक्ष अंडीपुंज निर्मितीवरून ३० लक्ष अंडीपुज निर्मिती करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत रेशीम अंडींपुज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे स्थनिक बीजकोष उत्पादकांकडून तसेच म्हैसूर (कर्नाटक) राज्यातून सीड अंडीपुंज आणून शेतकऱ्यांना पुरवठा करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले बीज कोष खरेदी करून अंडीपुंज उत्पादन केले जाते.

राज्यातील तुती रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता, राष्ट्रीय रेशीम कीटक बीज संगठण (NSSO), केंद्रीय रेशीम मंडळ, बंगळूरु यांच्या संदर्भाधीन दि.०९.०२.२०२४ रोजीच्या परिपत्रकातील सुधारीत दराच्या धर्तीवर पुढील निर्णय देण्यात येत आहे.

शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे निर्माण करण्यात येत असलेले रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

बी.व्ही.कोषांचे दर

अ.क्रप्युपेशन टक्केवारीसध्याचे प्रती किलो दर (रुपये)सुधारीत प्रती किलो दर (रूपये)
८०९५०१२५०
८१९५३१२५३
८२९५६१२५६
८३९५९१२५९
८४९६२१२६२
८५९६५१२६५
८६९६८१२६८
८७९७११२७१
८८९७४१२७४
१०८९९७७१२७७
११९०९८०१२८०
१२९१९८३१२८३
१३९२९८६१२८६
१४९३९८९१२८९
१५९४९९२१२९२
१६९५९९५१२९५
१७९६ च्या पुढे१०००१३००

सदर मान्यता ही पुढील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे
अ) बी.व्ही. बीज कोषाचे उत्पादन प्रति १०० अंडीपुंजास किमान ५० कि.ग्रॅ. होणे आवश्यक असून एका किलोमध्ये ५०० ते ७५० नग असणे आवश्यक आहे. एका किलोमध्ये ७५० चे वर कोष असल्यास सदरील कोष रिलींग दराने खरेदी करणे बंधनकारक राहील.
ब) संचालयालयाने मान्यता दिलेल्या बीज कोष उत्पादक शेतकऱ्याकडून तुती रेशीम बीज कोषाची खरेदी करणे बंधनकारक आहे.
क) संचालयालयाने मान्यता दिलेल्या बीज कोष उत्पादक शेतकऱ्याकडे केंद्रीय रेशीम मंडळाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे साधनसामुग्री व सोई सुविधा असणे गरजेचे असून रेशीम विकास अधिकारी गडहिंग्लज यांनी लाभार्थीकडे प्रत्यक्ष जावून पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांची यादी प्रमाणित करून संचालयालनास पाठवावी.
ड) रेशीम संचालनालयाने ठरवून दिलेल्या बीज कोष उत्पादकाव्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना बीज कोष अंडीपुंज घ्यावयाची असल्यास संचालनालयाची मान्यता घ्यावी.

वरीलप्रमाणे सुधारीत दर शासन निर्णयाचा दिनांक म्हणजेच ०७ मार्च २०२४ पासून लागू होतील.

Web Title: Increase in procurement rate of silk cocoon for production of mulberry silk seed required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.