पुणे : महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४च्या लेखी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे.
मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
तसेच गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती राज्य लोकसेवा आयोगाने दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १८ मे २०२५ रोजी ही कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४ घेण्यात आली होती. त्याचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे.
यात पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्यांना विहित शुल्कासह ९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या ०२२-६९१२-३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेला 'हा' साखर कारखाना राज्यातही ठरला सर्वोत्तम
