Pune : भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर हे ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नव्या प्रमुखाची प्रतीक्षा असली तरी तोपर्यंत सध्याचे अॅग्रीमेटचे प्रमुख डॉ. कृपान घोष यांच्याकडे भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेची सूत्रे सोपवण्यात आलेली आहेत.
दरम्यान, डॉ. कृपान घोष हे अॅग्रीमेटचे प्रमुख असून या विभागातर्फे शेतकऱ्यांना कृषी सल्ला देण्यात येतो. पुढील दोन दिवसाचे, पाच दिवसाचे, दोन आठवड्याचे, एका आठवड्याचे आणि एका महिन्याच्या हवामानाच्या अंदाजावरून कृषी सल्ला देण्यात येतो. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी हा सल्ला जात असल्यामुळे हा विभाग शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.
त्याबरोबरच निवृत्त झालेले डॉ. के. एस. होसाळीकर यांचे शेतकऱ्यांशी विशेष नाते होते. ते आपल्या ट्वीटर हँडलवरूनही ट्वीट करत हवामानाची अद्ययावत माहिती देत असत. त्याबरोबरच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हवामान विभागाच्या अंदाजाचा फायदा व्हावा यासाठी विस्तारामध्ये विविध बदल व्हावेत अशी आशा व्यक्त केली आहे.