Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात अंगाची होतेय काहिली; मग खा शरीराला आतून थंडावा देणारी 'ही' सहा फळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:55 IST

summer fruits उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. वाढत्या उष्यामुळे भूक मंदावत असली तरी तहान मात्र भरपूर लागते.

गेल्या काही दिवसांत उष्म्याचे प्रमाण वाढले असून, कमाल ३२ ते ३३ अंश तर किमान २७ ते २९ अंश सेल्सियस तापमान आहे.

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, तर घराबाहेर पडणेही अवघड होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावत आहे.

त्यामुळे शरीराला थंडावा देणारी, पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. वाढत्या उष्यामुळे भूक मंदावत असली तरी तहान मात्र भरपूर लागते.

घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावते. त्यावर पर्याय म्हणून पाण्याची कमतरता भरून काढणारी फळे खाण्याकडे कल असतो.

कलिंगड, टरबूज, द्राक्षे यासारखी फळे प्राधान्याने खाल्ली जातात. शीतपेयांपेक्षा फळाचे रस, सरबत, नारळपाणी, कोकम सरबत, आवळा सरबत प्राशन करणे उपयुक्त ठरते.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी फळे१) कलिंगडया फळामध्ये २२ टक्के पाणी असते. शिवाय फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट लाइकोपीन असून, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.२) टरबूजटरबूजमध्ये भरपूर पाणी व फायबर असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवते. पचनसंस्था सुधारते. कमी कॅलरी व जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी टरबुजाचा रस फायदेशीर ठरतो.३) चिकूचिकू हे ऊर्जा, जीवनसत्त्व (अव क), कॅल्शियम, फायबरचा उत्तम स्रोत असलेले गोड फळ आहे. हाडे मजबूत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शरीराला त्वरित ऊर्जा देण्यासाठी व मानसिक ताण कमर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.४) द्राक्षक जीवनसत्त्व व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून, हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती व पचनासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. रक्तदाब नियंत्रित करते, डोळ्यांचे आरोग्य राखते. त्वचेसाठी फायदेशीर आहे. फायबर व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजन नियंत्रित राहते.५) संत्रीउन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी संत्री उपयुक्त आहेत. पोटॅशियमचे चांगले स्रोत असून, ९० टक्के पाणी असलेले हे फळ व्हिटॅमिन सी, ए, कॅल्शिअम व फायबरने समृद्ध आहे.६) आंबाफळांचा राजा असलेल्या आंब्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॅलरीज असतात. त्यात जीवनसत्त्व अ आणि क असून, सोडियम, फायबर, २० पेक्षा अधिक जास्त खनिजे असल्याने उष्णतेपासून संरक्षण करतात.

अधिक वाचा: युद्धामुळे आंबा निर्यातीला मोठा ब्रेक; या आठवड्यात दरही उतरले; वाचा पेटीला काय मिळतोय दर?

टॅग्स :फळेतापमानद्राक्षेआंबाआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना