Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:55 IST

karj mafi update कर्ज निवारणासाठी शासनाकडून आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सांगली : जिल्ह्यातील ७ लाख ५१ हजार ५२३ शेतकऱ्यांपैकी ४ लाख ९९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीस्टॅक अ‍ॅपमध्ये नोंदणी केली आहे.

म्हणजे एकूण शेतकऱ्यांच्या ६६ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून २ लाख ५२ हजार ९८८ शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीस्टॅक अ‍ॅपमध्ये नोंदणीच केली नाही.

या शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून अर्ज अंतिम करण्याचे आवाहन केले आहे. कर्ज निवारणासाठी शासनाकडून आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांतील थकीत कर्जदारांचा तपशील गोळा केला जात आहे. सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवली जात आहे.

तसेच कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देता येईल. परंतु अनेकांनी अद्याप आधारकार्ड, अ‍ॅग्रीस्टॅक व संबंधित कागदपत्रे संस्थांकडे जमा केलेली नाहीत.

त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून ऑनलाइन प्रणालीतील नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याच्या बँकांच्या तक्रारी आहेत. या विलंबाचा परिणाम जाहीर होणाऱ्या कर्जमाफी अथवा सहाय योजनांवर होऊ शकतो.

तर कर्जमाफीची नोंदणी अडणार◼️ ज्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड, अ‍ॅग्रीस्टॅक अ‍ॅपमध्ये नोंदणी केली नाही, त्यांनी तातडीने सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेशी संपर्क साधावा.◼️ माहिती अपूर्ण राहिल्यास शासनाच्या पोर्टलवर शेतकऱ्यांची कर्जमाफीची नोंदणी होऊ शकणार नाही. वारंवार सांगून ही शेतकरी नोंदणी किंवा माहिती अपलोड करीत नसल्याने प्रशासनही हतबल आहे.

शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे त्वरित जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील कर्जमाफी योजनांचा लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतील. - सुनील चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सांगली

अधिक वाचा: पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; 'ह्या' निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers urged to register for loan waiver scheme immediately.

Web Summary : Sangli farmers risk losing loan waivers due to registration delays. 66% registered on AgriStack app. Incomplete documents and delays hinder the process. Farmers must immediately contact banks and complete registration to avoid problems with loan forgiveness.
टॅग्स :पीक कर्जशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारकुलसचिवआधार कार्डऑनलाइनसांगलीबँक