स्वयंपाकघरात काम करताना, गॅसजवळ उभे राहिल्यावर किंवा गरम पाणी हाताळताना अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
उकळते पाणी अंगावर पडल्यास त्वचेवर तीव्र जखम होऊ शकते. अनेकदा घाईगडबडीत चुकीचे उपाय केले जातात आणि जखम अधिक वाढते.
अशावेळी घाबरून न जाता योग्य प्रथमोपचार केल्यास भाजल्याची तीव्रता कमी करता येते आणि संसर्ग टाळता येतो.
काय कराल उपाय?◼️ भाजलेल्या भागावर लगेच स्वच्छ, थंड पाणी किमान १५ मिनिटे वाहू द्यावे.◼️ यामुळे उष्णतेचा परिणाम कमी होतो, वेदना कमी होतात त्वचेची हानी कमी होते.◼️ भाजलेल्या भागावर पाणी टाकल्यास फोड येतात असा गैरसमज आहे.◼️ मात्र, थंड पाण्यामुळे दाह आणि वेदना कमी होण्यास मदत होते.◼️ भाजलेल्या त्वचेला चिकटलेले कापड ओढू नका. उकळते पाणी पडल्यावर कपडे त्वचेला चिकटतात.◼️ अशावेळी ते जबरदस्तीने ओढल्यास त्वचा सोलली जाऊ शकते.◼️ शक्य असल्यास कपडे सावधपणे कापा; परंतु, जखमेवर चिकटलेला भाग तसाच ठेवावा.◼️ जखम मोठी असल्यास, फोड आले असल्यास किंवा चेहरा, हात, पाय, जननेंद्रिय भाग भाजला असल्यास त्वरित रुग्णालयात जावे.◼️ स्वच्छ, सैल आणि न चिकटणारी पट्टी बांधून रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत द्यावी.◼️ वैद्यकीय सल्ल्यानुसारच बर्न क्रीम किंवा मलम वापरावे. स्वतःहून औषधे वापरणे टाळावे.
भाजलेल्या ठिकाणी चिकटपट्टी लावू नकाभाजलेल्या त्वचेवर थेट चिकटपट्टी लावल्यास ती जखमेवर चिकटून त्वचा निघण्याची शक्यता असते.टूथपेस्ट, मलई, हळद, शाई लावू नका◼️ घरगुती उपाय म्हणून अनेक जण टूथपेस्ट, मलई, हळद, शाई किंवा तेल लावतात. त्यामुळे उपचारात अडथळा निर्माण होतो.◼️ जखम किती खोलवर आहे, याचा अंदाज लावणे कठीण होते. अशा गोष्टी टाळणे अत्यावश्यक आहे.
वैद्यकीय सल्ला◼️ उकळत्या पाण्यामुळे भाजण्याला 'स्कॉल्ड बर्न' म्हणतात.◼️ पहिल्या २० मिनिटांत योग्य प्रथमोपचार केल्यास जखमेची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करता येते.◼️ घरगुती उपायांपेक्षा स्वच्छ पाण्याचा वापर आणि त्वरित वैद्यकीय सल्ला अधिक सुरक्षित असतो.
अधिक वाचा: २५ एकर मुरमाड जमिनीत स्वत:चे भाग्य स्वत: उजळवणारा शेतकरी अर्जुन पाटेखेडे; वाचा त्यांची यशकथा
Web Summary : For burns from boiling water, immediately rinse with cool water for 15 minutes. Avoid removing stuck clothing. Seek medical help for severe burns and don't apply toothpaste or other home remedies. Prompt action minimizes damage.
Web Summary : उबलते पानी से जलने पर, तुरंत 15 मिनट तक ठंडे पानी से धोएं। चिपके हुए कपड़ों को न हटाएं। गंभीर जलन के लिए चिकित्सा सहायता लें और टूथपेस्ट या अन्य घरेलू उपचार न करें। तत्काल कार्रवाई से नुकसान कम होता है।