आजच्या काळात कुटुंबाची बहुतांश आर्थिक व्यवस्था ऑनलाइन झाली आहे. बँक खाती, गुंतवणूक, बिले आणि डिजिटल पासवर्ड सहसा घरातील एकाच व्यक्तीला माहीत असतात.
त्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला या माहितीअभावी अनेक कायदेशीर आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून एक 'डेथ फोल्डर' तयार करणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला हे फोल्डर कुठे आहे आणि ते संकटकाळी कसे उघडायचे, याची माहिती नक्की द्या. यामुळे कायदेशीर अडचणी टाळता येतात.
वैयक्तिक आणि ओळख संबंधित कागदपत्रे कोणती?◼️ यात जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास नाव बदलल्याचे शपथपत्र यांचा समावेश असावा.◼️ ही कागदपत्रे तुमची ओळख आणि कायदेशीर स्थिती सिद्ध करण्यास मदत करतात.
आर्थिक आणि संपत्ती तपशीलमध्ये काय द्याल?◼️ तुमची सर्व बँक खाती, एफडी, डिमॅट खाते, शेअर्स, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी आणि पेन्शनचा तपशील येथे ठेवा.◼️ तसेच, नॉमिनीची नावे, कर्जे आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा सीएचा संपर्क क्रमांकही नमूद करा.
हे फोल्डर कुठे ठेवावे?◼️ फिजिकल फोल्डर : एका सुरक्षित कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवा.◼️ डिजिटल फोल्डर : कॉम्प्युटर किंवा पेनड्राइव्हमध्ये एनक्रिप्टेड स्वरूपात ठेवा.◼️ अपडेट करा : हे फोल्डर एकदा बनवून सोडून देऊ नका. दर ६ महिने किंवा वर्षभराने त्यात काही बदल झाले असल्यास (उदा. नवीन बँक खाते, नवीन गुंतवणूक) ते अपडेट करा.
कायदेशीर कागदपत्रांमध्ये काय येते?◼️ यात तुमचे मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नी, ट्रस्टची कागदपत्रे आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र यांचा समावेश असावा.◼️ मूळ कागदपत्रे कुठे ठेवली आहेत आणि ती कोणाकडून मिळवता येतील, याची स्पष्ट माहिती तिथे लिहा.
रिअल इस्टेट आणि व्यवसाय दस्तऐवजतुमच्या घराची किंवा जमिनीची कागदपत्रे, खरेदीखत, प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्या, होम लोनची माहिती आणि जर तुमचा व्यवसाय असेल, तर त्यासंबंधीचे ओनरशिप पेपर आणि 'बिझनेस सक्सेशन प्लॅन' यात समाविष्ट करा.
डिजिटल मालमत्ता आणि ऑनलाइन अकाउंट्स◼️ ईमेल, सोशल मीडिया प्रोफाइल्स, क्लाउड स्टोरेज आणि महत्त्वाच्या सबस्क्रिप्शन्सची यादी करा.◼️ सुरक्षेसाठी पासवर्ड थेट कागदावर लिहिण्याऐवजी, ते सुरक्षित ठेवण्यासाठी 'पासवर्ड मॅनेजर'चा वापर करा आणि त्याचा मास्टर पासवर्ड किंवा तो मिळवण्याची पद्धत फोल्डरमध्ये नमूद करा.◼️ 'डेथ फोल्डर' ही नकारात्मक कल्पना नसून जबाबदार आर्थिक नियोजनाचा भाग आहे.◼️ यामुळे कुटुंबीयांना कठीण काळात योग्य निर्णय घेणे सोपे जाते आणि कायदेशीर अडचणी टाळता येतात.
अधिक वाचा: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; घरगुती सिलिंडर आता किती रुपयाला मिळणार?
Web Summary : Create a 'Death Folder' with personal, financial, and legal documents for your family. Include asset details, digital accounts, and a will. Keep it updated and share its location with a trusted person to ease legal burdens.
Web Summary : परिवार के लिए 'डेथ फोल्डर' बनाएं, जिसमें व्यक्तिगत, वित्तीय और कानूनी दस्तावेज हों। संपत्ति विवरण, डिजिटल खाते और वसीयत शामिल करें। इसे अपडेट रखें और किसी भरोसेमंद व्यक्ति के साथ इसका स्थान साझा करें ताकि कानूनी बोझ कम हो।