Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; घरगुती सिलिंडर आता किती रुपयाला मिळणार?

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; घरगुती सिलिंडर आता किती रुपयाला मिळणार?

LPG gas cylinder price hike; How much will a home used cylinder cost now? | एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; घरगुती सिलिंडर आता किती रुपयाला मिळणार?

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; घरगुती सिलिंडर आता किती रुपयाला मिळणार?

LPG Gas Price केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली.

LPG Gas Price केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली.

मुंबई : केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली.

१९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ९९३ रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली असून, छोट्या व्यावसायिक ५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सामान्य ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे.

मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी ३ हजार २४ रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही किंमत २ हजार ३१ रुपये होती, असे हॉटेल चालकांनी सांगितले. तर ५ किलोचे सिलिंडर आता ५४९ ऐवजी ८१० रुपयांना मिळेल.

निवडणुकीनंतर लगेच झालेल्या या दरवाढीमुळे लघुउद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि कॅटरिंग व्यवसायांवर थेट परिणाम होणार आहे.

तेल कंपन्या दरमहा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, विनिमय दर आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन दर निश्चित करतात.

मार्चपासून चार वेळा दरवाढ
◼️ १ मार्च २०२६ : ३० रुपये.
◼️ ७ मार्च २०२६ : ११४ रुपये.
◼️ एप्रिल २०२६ : २०० रुपये.
◼️ १ मे २०२६ : ९९३ रुपये.

या वर्षी दर १,४०० रुपयांनी वाढले
◼️ ऑगस्ट २०२५ : ३३.५० रुपये घट.
◼️ नोव्हेंबर २०२५ : किरकोळ घट.
◼️ जाने - मे २०२६ : सुमारे १,४०० रु. वाढ.

गेल्या १२ महिन्यांचा ट्रेंड
महिना - दर (रुपयांत)

जून २०२५ - १,७२३
जुलै २०२५ - १,६६५
ऑगस्ट २०२५ - १,६३१
सप्टेंबर २०२५ - १,५८०
ऑक्टोबर २०२५ - १,५९५
नोव्हेंबर २०२५ - १,५९०
डिसेंबर २०२५ - १,५८०
जानेवारी २०२६ - १,६९१
फेब्रुवारी २०२६ - १,७४०
मार्च २०२६ - १,८८३
एप्रिल २०२६ - २,०७८
मे २०२६ - ३,०७१

अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज

Web Title : एलपीजी गैस सिलेंडर के दाम बढ़े; अब नई दरें देखें!

Web Summary : व्यावसायिक एलपीजी सिलेंडर की कीमतों में भारी वृद्धि हुई, मुंबई में 19 किलो के सिलेंडर के लिए ₹993 की वृद्धि हुई, अब इसकी कीमत ₹3,024 है। घरेलू सिलेंडर अपरिवर्तित रहे, जिससे अस्थायी राहत मिली। इस वृद्धि से होटल और रेस्तरां जैसे व्यवसायों पर असर पड़ेगा।

Web Title : LPG Gas Cylinder Prices Surge; Check New Rates Now!

Web Summary : Commercial LPG cylinder prices significantly increased, with a ₹993 hike for 19kg cylinders in Mumbai, now costing ₹3,024. Domestic cylinders remain unchanged, offering temporary relief. The rise impacts businesses like hotels and restaurants.