रेबीज हा प्राणघातक संसर्गजन्य आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो आणि त्यात महाराष्ट्राच्या शहरी भागांतील लोकांची संख्या अधिक असते.
धोका आणि लक्षणे◼️ रेबीज विषाणू मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो.◼️ लक्षणे दिसल्यानंतर उपचार शक्य नसतात.◼️ या रोगाच्या अंतिम टप्प्यात हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती निर्माण होते.◼️ रुग्णाला पाणी पाहून किंवा पिण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र वेदना होतात, भीती वाटते.◼️ घशात आकडी येते आणि मृत्यू अटळ ठरतो.
रेबीजग्रस्त कुत्रे कसे ओळखावेत?◼️ मागचे पाय कमकुवत होणे.◼️ मान आणि डोके सरळ न ठेवणे.◼️ तोंडातून लाळ गळणे.◼️ भुंकण्याचा आवाज बदलणे.◼️ कोणत्याही कारणाशिवाय चावणे.
बंदोबस्त कसा करावा?◼️ नसबंदी, लसीकरण मोहीम जलदगतीने राबवणे.◼️ आश्रयगृहांची उभारणी करून नीट व्यवस्थापन करणे.◼️ कचरा व्यवस्थापन करून उघड्यावरील अन्नाचा उगम कमी करणे.◼️ शाळा, वसाहतींमध्ये जनजागृती मोहिमा राबवणे.
कुत्रा चावल्यास तातडीने हे करा◼️ जखम लगेच साबण आणि पाण्याने किमान १५ मिनिटे स्वच्छ धुवावी.◼️ डॉक्टरांचा सल्ला घेऊन ०, ३, ७, १४, २८ दिवस अशा वेळापत्रकानुसार रेबीज लस घ्यावी.◼️ मोठ्या जखमेवर किंवा रक्तस्त्राव झाल्यास, प्रतिलस थेट जखमेच्या आसपास द्यावी.
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर