Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल?

गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल?

How to control weeds in wheat and gram crops? | गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल?

गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल?

खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते.

खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते.

'तन खाई धन' अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते. तणे ही कुठल्याही प्रकारच्या जमिनीत विपरीत किंवा अनुकूल दोन्हीही प्रकारच्या हवामानात कुठल्याही प्रकारची काळजी न घेताही जोमाने वाढत असतात. त्यामुळे ते लागवड केलेल्या मुख्य पिकाशी हवा, पाणी व सूर्यप्रकाशासाठी कायम स्पर्धा करीत असतात. मुख्य पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्याशी सर्वच बाबींसाठी स्पर्धा करत असलेल्या तणांचे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे असते.

गहू पिकात चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. अंतरमशागत केल्याने तणांचा तर नाश होतोच त्याचबरोबर जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकवून राहण्यासही मदत होते. त्याकरिता गहू पिकात जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन तणविरहित ठेवावी. गहू पिकातील अरुंद आणि रुंद पानांच्या तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल + आयडोसल्फूरॅान मिथाईल सोडियम, हेक्टरी ४०० ग्रॅम किंवा २,४-डी (सोडियम) + २% युरिया, हेक्टरी ६०० ते १२५० ग्रॅम, ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. हे सगळे लक्षात घ्यायला अवघड वाटत असेल तर सरळ अलग्रीप या तणनाशकाची हेक्‍टरी २० ग्रॅम किंवा एकरी ८ ग्रॅम या प्रमाणात हेक्टरी ५०० लिटर किंवा एकरी २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

हरभरा पिकात पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी पेरणीनंतर ३० दिवसांनी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती राहून पिकाची चांगली वाढ होते. कोळपणीनंतर दोन रोपांमधील गवत काढण्यासाठी किमान एक खुरपणी अवश्य करावी. कोरडवाहू हरभरा पिकात कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजल्या जाऊन जमिनीत ओल टिकून राहण्यास मदत होते. हरभरा पेरणी पूर्वी स्टाम्प प्रती हेक्टरी २.५ लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत ओल असताना फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस पाणी देवू नये.

- डॉ. कल्याण देवळाणकर

Web Title: How to control weeds in wheat and gram crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.