Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात सर्वात जास्त दर देणारा माळेगाव कारखाना यंदा किती ऊस गाळप करणार?

राज्यात सर्वात जास्त दर देणारा माळेगाव कारखाना यंदा किती ऊस गाळप करणार?

How much sugarcane will crush this year? by malegaon factory, which offers the highest price for sugarcane in the state | राज्यात सर्वात जास्त दर देणारा माळेगाव कारखाना यंदा किती ऊस गाळप करणार?

राज्यात सर्वात जास्त दर देणारा माळेगाव कारखाना यंदा किती ऊस गाळप करणार?

malegaon sugar factory माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ हंगामासाठी पूर्वनियोजित तयारी करण्यात येत आहे.

malegaon sugar factory माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ हंगामासाठी पूर्वनियोजित तयारी करण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ हंगामासाठी पूर्वनियोजित तयारी करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी माळेगाव कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, तसेच नवनिर्वाचित संचालक अविनाश देवकाते यांच्या हस्ते पार पडले.

या वर्षाच्या चालू गळीत हंगामात कारखान्याने साधारणतः १५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

त्यासाठी अधिकारी व कर्मचारी अधिक मेहनत घेऊन गेटकेन ऊस जास्तीत जास्त मिळवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी स्पष्ट केले.

यावेळी माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, जयपाल देवकते, अविनाश देवकाते तसेच कारखान्याचे आजी-माजी संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

अधिक वाचा: शेतकरी उत्पादक गट, कंपन्या व सहकारी संस्थासाठी ऊस विकास योजना; कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर

Web Title: How much sugarcane will crush this year? by malegaon factory, which offers the highest price for sugarcane in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.