Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरातील सोने गहाण ठेवून, कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला खरा; मात्र शासनाच्या अनुदानाचा अजून पत्ता लागेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:02 IST

tractor anudan अनुदान थकल्याने ३ हजार ४५७ शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना बँकाच्या व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शासनाकडून अनुदान मिळणार म्हणून घरातील सोने, जमीन गहाण ठेवून, बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर, कृषी अवजारे व इतर यंत्रसामग्री खरेदी केलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ७० कोटी अनुदान शासनाकडून थकले आहे.

परिणामी कृषी विभागाने नवीन मंजुरी थांबवली आहे. अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करणारे मंजुरीसाठी तर अनुदान मिळणार म्हणून कृषी यंत्र खरेदी केलेले तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत.

अनुदान थकल्याने ३ हजार ४५७ शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना बँकाच्या व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मंजूरटंचाईमुळे शेतीची मशागत, पेरणी, मळणी, काढणी, फवारणी शेतमाल वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीची गरज निर्माण झाली आहे.

सर्वच शेतकऱ्यांना बैलजोडीचे संगोपन करणे परवडत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना शेती यंत्रावरच अवलंबून राहावे लागते. म्हणून शेतकरी ट्रॅक्टर व त्याला आवश्यक ती अवजारे खरेदी करतो.

ट्रॅक्टरची किंमत सात ते दहा लाखांपर्यंत तर अवजारांच्या किमती लाखांवर आहेत. यासाठी अनुदान मिळाले तर संबंधित शेतकऱ्यांना मिळतो. म्हणून शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेतून अर्ज करतात.

अनुदानासाठी पात्र ठरल्यानंतर तो खरेदी करतो. पूर्ण रक्कम भरून ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर जीएसटीसह पावत्या कृषी विभागाकडे जमा केल्यानंतर शासनाकडून अनुदान येते.

त्यानंतर कृषी प्रशासन संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होते. पण अनुदान थकल्यामुळे लाभार्थी शेतकरी हवालदिल आहेत.

अनुदान कमी तेही वेळेत नाही...◼️ ट्रॅक्टर आणि इतर अवजारांच्या किमतीच्या तुलनेत मिळणारे अनुदान अत्यल्प आहे.◼️ यंत्राशिवाय शेती अशक्य असल्याने कर्जबाजारी होऊन शेतकरी ट्रॅक्टर, यंत्रे खरेदी करतात.◼️ पण अनुदानच थकल्याने लाभार्थीची आर्थिक कोंडी झाली आहे.

किती अनुदान मिळते ?◼️ आठ ते १२ एचपीपर्यंतच्या पॉवर ट्रेलरसाठी ८० हजार ते एक लाख रुपये, ११ एचपीवरील पॉवर ट्रेलरसाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते.◼️ ट्रॅक्टरसह अवजारे दहा लाखांपर्यंत घेतल्यास चाळीस टक्के म्हणजे चार लाख, २५ लाखांपर्यंत यंत्रे खरेदी केली तर दहा लाखांचे अनुदान मिळते.

४३ कोटींचे अनुदान वाटप◼️ तीन जिल्ह्यांतील पात्र लाभार्थीसाठी शासनाकडून मिळालेले ४३ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.◼️ कोल्हापूर जिल्ह्यासाठी १२ कोटी ५९ लाख सांगली जिल्ह्यात ११ कोटी १९ लाख, साताऱ्यासाठी १९ कोटी २६ लाखांचे अनुदान वितरित झाले आहे.

अधिक वाचा: Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाचा रूट बदलल्यामुळे 'या' गावांना लागली लॉटरी; दुर्गम भागाचा होणार कायापालट

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers face financial crisis as promised government tractor subsidies delayed.

Web Summary : Farmers in Kolhapur, Sangli, and Satara are struggling due to delayed government subsidies for tractors and farm equipment. Around ₹70 crore is due, impacting over 3,457 farmers who took loans, and face financial burdens due to interest payments.
टॅग्स :शेतीशेतकरीकृषी योजनासांगलीकोल्हापूरसरकारराज्य सरकार