Join us

राज्यस्तरीय मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, विविध व्याख्यानांचे आयोजन

By मुक्ता सरदेशमुख | Updated: August 30, 2023 20:27 IST

बदलत्या हवामानाचा मुकाबला करत आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या उपायोजनांसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय      शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून पंधरा ...

बदलत्या हवामानाचा मुकाबला करत आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या उपायोजनांसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय     शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून पंधरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी  विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा गुरुवार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजेपासून आहे.

३० ऑगस्ट २०२३ हा दिवस महाराष्ट्रात राज्यात “शेतकरी दिन” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) तर्फे देवळाली कॅम्प येथील एस. व्ही के.टी. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी मविप्र राज्यस्तरीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती एस व्ही के की महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस काळे यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी होणार उपायात्मक मार्गदर्शन

सह्याद्री फार्मचे संचालक विलासराव शिंदे हे आर्थिक उन्नतीसाठी शेतीचा राजमार्ग या विषयावर तर आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ व ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे हे वातावरण बदलांचा सामना करतांना शेतीसाठी एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा उपयोग याविषयी माहिती देणार आहेत. तर कृषी उपसंचालक जे. आर पाटील हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध शासकीय योजना या विषयावर तर कृषीभूषण तुकाराम बोराडे हे शेतकरी राजांचे अन्नदान व प्राणवायूदान या‌विषयी मार्गदर्शन करणार आहेत. 'मविप्र' सरचिटणीस अॅड  नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.

बदलत्या हवामानाचा सामना करतांना राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्यात सहभागी होऊन आपली पुढील वाटचालीची दिशा ठरवावी असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रशेतीहवामानपाऊसपीक व्यवस्थापननाशिक