lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या पेरू वाणाला पेटंट मिळाले

कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या पेरू वाणाला पेटंट मिळाले

Guava variety patent by Krishi Vigyan Kendra, Baramati | कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या पेरू वाणाला पेटंट मिळाले

कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या पेरू वाणाला पेटंट मिळाले

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांना दिले आहे. भारतातील असे पहिले कृषि विज्ञान केंद्र आहे की ज्यांनी अशा प्रकारचे काम केले आहे. केंद्रीय समशीतोष्ण फलोत्पादन संस्था, लखनऊ येथून आणलेल्या पेरूच्या ‘ललित’ या वाणामधून निवड पद्धतीने हा वाण विकसित केला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांना दिले आहे. भारतातील असे पहिले कृषि विज्ञान केंद्र आहे की ज्यांनी अशा प्रकारचे काम केले आहे. केंद्रीय समशीतोष्ण फलोत्पादन संस्था, लखनऊ येथून आणलेल्या पेरूच्या ‘ललित’ या वाणामधून निवड पद्धतीने हा वाण विकसित केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथील यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या व त्यांचे सहकारी यांनी मिळून निवड पद्धतीने विकसित केलेल्या “रत्नदिप” या पेरूच्या वाणाला पिक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम २००१ अंतर्गत स्वामित्व हक्क (पेटंट) मिळाला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांना दिले आहे. भारतातील असे पहिले कृषि विज्ञान केंद्र आहे की ज्यांनी अशा प्रकारचे काम केले आहे. केंद्रीय समशीतोष्ण फलोत्पादन संस्था, लखनऊ येथून आणलेल्या पेरूच्या ‘ललित’ या वाणामधून निवड पद्धतीने हा वाण विकसित केला आहे. यासाठी २०१० पासून काम चालू होते. स्वामित्व हक्क प्रमाणपत्रामुळे पेरूच्या “रत्नदिप” या वाणावर कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचा अधिकार असणार आहे. या वाणापासून रोपे तयार करणे, ती विकसित करणे आणि विक्री करणे यांचे सर्व अधिकार कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्याकडे असतील.

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार, विश्वस्त श्री. विष्णुपंत हिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी या कामाबद्दल उद्यानविद्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

पेरू वाण “रत्नदिप” वैशिष्ट्ये
फळाच्या गराचा रंग गुलाबी लाल आहे व गराचा सुगंध चांगला आहे.
- फळामध्ये बियांचे प्रमाण कमी असून बिया मऊ आहेत (८.० kg/cm2) आणि गराचे प्रमाण जास्त आहे यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी या वाणाला प्रचंड मागणी आहे.
फुलांचे फळामध्ये रूपांतरण होण्यास इतर वाणापेक्षा कमी कालावधी लागतो (१०० ते १२० दिवस)
प्रती एकर १० ते १२ टन उत्पादन मिळते.
विशेषतः मृग बहार मध्ये या वाणापासून उत्पादन चांगले मिळते.
फळांचे सरासरी वजन २५०-३०० ग्रॅम आहे.

Web Title: Guava variety patent by Krishi Vigyan Kendra, Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.