Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > हरभरा फसला, राजमा बहरला; हरभऱ्याच्या तुलनेत राजमाचा खर्च कमी, शेतकऱ्यांची पसंती वाढली

हरभरा फसला, राजमा बहरला; हरभऱ्याच्या तुलनेत राजमाचा खर्च कमी, शेतकऱ्यांची पसंती वाढली

Grams failed, rajma beans flourished; The cost of rajama beans is less than that of gram, increasing farmers' preference | हरभरा फसला, राजमा बहरला; हरभऱ्याच्या तुलनेत राजमाचा खर्च कमी, शेतकऱ्यांची पसंती वाढली

हरभरा फसला, राजमा बहरला; हरभऱ्याच्या तुलनेत राजमाचा खर्च कमी, शेतकऱ्यांची पसंती वाढली

भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव आणि वडोद तांगडा परिसरात यंदा काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकरात राजमा या पिकाची लागवड केली असून, हे पीक जोमात बहरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव आणि वडोद तांगडा परिसरात यंदा काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकरात राजमा या पिकाची लागवड केली असून, हे पीक जोमात बहरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

अनिल तांगडे 

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव आणि वडोद तांगडा परिसरात यंदा काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकरात राजमा या पिकाची लागवड केली असून, हे पीक जोमात बहरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. संतोष तांगडे, विनायक तांगडे, कडुबा कड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच राजमा पेरणीचा प्रयोग केला असून, तो यशस्वी ठरत आहे.

डॉलर हरभऱ्याच्या तुलनेत राजमा पिकाचा खर्च कमी असून, मर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प आहे. राजमा हे पीक सुमारे अडीच महिन्यांत तयार होत असल्याने वर्षातून दोन ते तीनवेळा उत्पादन घेणे शक्य होते. तसेच, कोणत्याही हंगामात हे पीक घेता येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावर्षी परिसरात डॉलर हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असली तरी मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट झाली आहे. महागडी बुरशीनाशके फवारूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने शेतकरी या पिकावर नाराज आहेत.

त्याउलट राजमा पिकावर फवारणीचा खर्च कमी येत असून, उत्पादन समाधानकारक मिळत आहे. त्यामुळे पुढील वर्षी राजमाच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रब्बीतील हरभरा मागे पडणार असल्याचे दिसून येत आहे.

पहिल्यांदाच राजमाची पेरणी केली. त्यासाठी ८ हजार खर्च आला. मर रोगाचा धोका नसल्याने औषधांचा खर्च वाचला आहे. एका एकरातून १५ क्विंटल उत्पादन होइल. सध्या दहा हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. - पांडुरंग पालोदकर, शेतकरी, वडोद तांगडा.

बाजारपेठेची अडचणही नाहीराजमा हे प्रथिने, कॅल्शियमयुक्त पीक असून, हॉटेल उद्योगात तसेच पुणे, दिल्ली आदी ठिकाणी निर्यातीसाठी याला मोठी मागणी आहे. व्यापारी थेट शेतातून माल उचलत असल्याने बाजारपेठेची अडचणही नाही. यामुळे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. - संतोष तांगडे, शेतकरी, वडोद तांगडा.

हेही वाचा : दीड एकर पेरू बागेतून शेतकऱ्याने घेतली ३ लाखांची झेप; आंतरपिकांतून देखील अतिरिक्त नफा

Web Title : चना विफल, राजमा फला-फूला; किसान लागत प्रभावी राजमा को पसंद करते हैं।

Web Summary : जालना जिले के किसान चने की तुलना में कम लागत और रोग प्रतिरोधक क्षमता के कारण राजमा की खेती की ओर रुख कर रहे हैं। राजमा जल्दी परिपक्व होता है, जिससे कई फसलें हो सकती हैं। होटल और निर्यात में उच्च मांग अच्छी आय सुनिश्चित करती है, जिससे अगले साल अधिक किसानों को राजमा अपनाने के लिए प्रोत्साहित किया जा रहा है।

Web Title : Chickpea fails, kidney bean flourishes; farmers favor cost-effective Rajma.

Web Summary : Farmers in Jalna district are turning to Rajma cultivation due to lower costs and disease resistance compared to chickpeas. Rajma matures quickly, allowing multiple harvests. High demand in hotels and for export ensures good returns, encouraging more farmers to adopt Rajma next year.