Join us

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:39 IST

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील पिक नुकसानभरपाई बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

२१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. 

साताराजिल्ह्यातील ११ हजार ११३ शेतकऱ्यांच्या चार हजार २१९.२८ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी सहा कोटी २९ लाख तीन हजार रुपये

कोल्हापूरजिल्ह्यातील पाच हजार ८६० शेतकऱ्यांच्या एक हजार ६९६.३६ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन कोटी १८ लाख रुपये

बीडआठ लाख सहा हजार ५१३ शेतकऱ्यांच्या सहा लाख ४४ हजार ९१८.५५ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी ५७७ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये.

धाराशिवचार लाख चार हजार ६५६ शेतकऱ्यांच्या तीन लाख ११ हजार २९१.२३ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २९२ कोटी ४९ लाख २२ हजार रुपये

लातूरचार लाख १५ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या २३ लाख सहा हजार ६२८.९९ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २०२ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये

परभणीचार लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८५ हजार ८५३.७८ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपये

नांदेड८३ हजार २६७ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७३.०२  हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होईल.

अधिक वाचा: जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई आली; कोणत्या विभागाला किती मदत?

टॅग्स :शेतीपूरपीकशेतकरीपुणेराज्य सरकारसरकारशासन निर्णयबीडधाराशिवलातूरपरभणीनांदेडकोल्हापूरपाऊस