मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेतजमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात 'वर्ग-२' मधून 'वर्ग-१' करण्याबाबतचे धोरण ३१ मार्च २०२६ पर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
माजी सैनिकांना वाटप केलेल्या सीलिंग जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ करताना आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यात सूट देण्याची मागणी प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. या जमिनी सध्या वर्ग २ असल्याने त्या हस्तांतरित करण्यावर कायदेशीर मर्यादा आहेत.
महसूलमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत सांगितले की, या जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी सरकार सकारात्मक असून, यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
चिंता नको, अधिमूल्यात मिळणार मोठी सवलत◼️ या जमिनींचे वाटप भूमिहीन, शेतमजूर आणि माजी सैनिकांना करण्यात आले आहे, ही बाब लक्षात घेऊन त्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी सरकार विशेष काळजी घेणार आहे.◼️ नझुल जमिनींच्या रूपांतरणासाठी जो कायदा आणि दर आपण निश्चित केले आहेत, त्यांचा आधार घेऊन या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी किमान रक्कम आकारली जाईल.◼️ यामुळे माजी सैनिकांना आणि गरिबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हरकती, सूचनांचा विचार करून धोरण येणार◼️ या जमिनींच्या रूपांतरणासाठी १४ जानेवारी २०२६ रोजी नियमांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.◼️ ११ फेब्रुवारीपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर विचार करून आता कायदा व न्याय विभाग आणि वित्त विभागाने ही फाइल मंजूर केली आहे.◼️ ३१ मार्चअखेरपर्यंत या जमिनी 'क्लास-२' मधून 'क्लास-१' करण्याचे अंतिम धोरण प्रसिद्ध केले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Maharashtra to finalize policy by March 2026 converting Class-2 land to Class-1 for ex-soldiers, landless farmers, and laborers. Concessions on premium charges are expected, easing transfer limitations. The government aims for minimal charges, offering financial relief. A final policy considering suggestions will be released soon.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने पूर्व सैनिकों, भूमिहीन किसानों और मजदूरों के लिए क्लास-2 भूमि को क्लास-1 में बदलने की नीति 2026 तक अंतिम रूप देने का फैसला किया है। प्रीमियम शुल्क में छूट की उम्मीद है, जिससे हस्तांतरण सीमाएं कम होंगी। सरकार का लक्ष्य न्यूनतम शुल्क लेना है, जिससे वित्तीय राहत मिलेगी। सुझावों पर विचार कर जल्द ही अंतिम नीति जारी की जाएगी।