राज्य सरकारर्फे सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविली जाते. याअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना १०० टक्के अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. वाशिम जिल्ह्यातील अनेक भूमिहीनांना शेतजमीन मिळाली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, तसेच त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते.
या योजनेंतर्गत चार एकर जिरायत शेतजमीन खरेदीकरिता प्रतिएकर ५ लाख रुपये व दोन एकर बागायत जमिनीकरिता प्रतिएकर ८ लाख रुपये कमाल मर्यादा आहे.
योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते.
वाशिम जिल्ह्यात या योजनेकरिता ज्या शेतकऱ्यांना शेती विकायची आहे, अशा इच्छुक मालकांनी, तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभाथ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडे सादर करता येतात.
अर्ज कोठे करायचा?
या योजनेच्या लाभासाठी वाशिम जिल्ह्याच्या सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधून परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो.
योजनेचे निकष काय?
• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
• वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे इतकी असावी.
• भूमिहीन शेतमजूर असल्यास स्त्रिया/विधवा स्त्रिया व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीतील अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येईल.
भूमिहीनांना किती शेती मिळते?
दोन ओलिताखालील किंवा चार एकर करार भनीन या योजनेतुन मिळते. त्यासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे.
काय आहे योजना?
राज्यात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेचा पात्र आणि गरजुंनी लाभ घ्यावा. - मारोती वाठ, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग वाशिम.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात