राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यात येते.
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.
कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरीता रु. १४० कोटी व वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता रु. २० कोटी असा एकूण रु. १६० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सन २०२३-२४ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता रु. १६०.०० कोटी (रुपये एकशे साठ कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे.
योजनेंतर्गत घटकनिहाय वितरण पुढीलप्रमाणे
| मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत मंजूर घटक | वितरीत निधी (रुपये कोटीत) |
| अ. सूक्ष्म सिंचन {राष्ट्रीय कृषि विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान} | १४०.०० |
| ब. वैयक्तिक शेततळे | २०.०० |
| एकूण | १६०.०० |
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा केली जाईल.
