Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

General category farmers will now get solar agricultural pumps by paying 10 percent; Read in detail | सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

magel tyala saur krushi pump 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्थायी आहे

magel tyala saur krushi pump 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्थायी आहे

बारामती : 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्थायी आहे

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच वितरित केला जातो.

तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के आहे, बाकीचे केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानरूपात मिळते.

जमिनीच्या आकारानुसार, ३ ते ७.५ अश्वशक्तीच्या पंपांसह पाच वर्षांची दुरुस्ती हमी, विमा, वीजबिलाची समस्या नाही आणि लोडशेडिंगची अडचण नाही. सिंचनासाठी दिवसाच्या वेळेत वीज पुरवठा शक्य झाला आहे.

२.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ३ अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषी पंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन धारकांसाठी ५ अश्वशक्ती आणि ५ एकरांवरील शेतजमीन धारकांसाठी ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्याची योजना आहे.

पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो मान्य केला जाईल. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिरी, बोअरवेल यांचे मालक बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्यांजवळील शेतजमीन धारक शेतकरीदेखील या योजनेसाठी पात्र होतील.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, जसे की बोअरवेल, विहिरी वगैरे, त्याची खात्री महावितरणद्वारे केली जाईल. तथापि, जलसंधारणाच्या कामाच्या पाणी साठ्यामधून पाणी उचलण्यासाठी हे पंप वापरता येणार नाहीत.

'अटल सौर कृषी पंप योजना-१', 'अटल सौर कृषी पंप योजना-२' आणि 'मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना' या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.

याबाबत महावितरणच्या सूत्रांनी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले; मात्र, अधिकृत पुरवठा का होऊ शकलेला नाही, या प्रश्नावर महावितरणकडून अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच मागेल त्याला एक महिन्यात सौरपंप देणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

३,१३७ शेतकऱ्यांना सौरपंप
◼️ महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, बारामती मंडळात ७३०० शेतकऱ्यांनी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत सौर पंपाची मागणी करीत पैसे भरले आहेत.
◼️ त्यापैकी ५,९६८ शेतकऱ्यांनी व्हेंडर देखील निवडले आहेत. त्यापैकी ३,१३७ शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यात आले आहेत, आणि २,३६९ सौर पंप सुरू झाले आहेत.

६० दिवसांच्या मुदतीत सौरपंप बंधनकारक
५,९६८ शेतकऱ्यांनी व्हेंडर निवड करून देखील अद्याप २,८३१ शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यात आलेले नाहीत. ६० दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप पुरवठादार कंपनीला स्थापित करणे बंधनकारक आहे.

अधिक वाचा: केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

Web Title : किसानों के लिए सौर पंप: 10% भुगतान से मिलेगी सुविधा

Web Summary : किसान केवल 10% लागत का भुगतान करके सौर पंप प्राप्त कर सकते हैं। इस योजना में पांच साल की वारंटी के साथ 3 से 7.5 हॉर्सपावर के पंप दिए जाते हैं। इसका उद्देश्य सिंचाई के लिए दिन के समय बिजली प्रदान करना और बिजली कटौती की समस्याओं को हल करना है। बारामती में 3,000 से अधिक किसानों को पहले ही लाभ मिल चुका है।

Web Title : Solar Pumps for Farmers: 10% Payment Opens Access

Web Summary : Farmers can get solar pumps by paying just 10% of the cost. The scheme offers pumps of 3 to 7.5 horsepower with a five-year warranty. It aims to provide daytime electricity for irrigation, solving power cut issues. Over 3,000 farmers in Baramati have already benefited.