Join us

राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधी आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:50 IST

pik nuksan bharpai 2025 राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते.

राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते.

त्यापोटी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार निधीला मान्यता दिली आहे. यात पुणे जिल्ह्यातील एप्रिल व मे महिन्यात १५ हजार ३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

याचा फटका ४६ हजार २९ शेतकऱ्यांना बसला होता. त्यासाठी राज्य सरकारने २५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विभानिहाय शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र आणि निधी खालीलप्रमाणे

विभागशेतकरी संख्याबाधित क्षेत्र (हेक्टर)मंजूर निधी (रुपये)
छत्रपती संभाजीनगर६७ हजार ४६२३४ हजार ५४२.४६५९ कोटी ९८ लाख २० हजार
पुणे१ लाख ७ हजार४५ हजार १२८.८८८१ कोटी २७ लाख २७ हजार
नाशिक१ लाख ५ हजार १४७४५ हजार ९३५.१६८५ कोटी ६७ लाख ८ हजार
कोकण१३ हजार ६०८४ हजार ४७३.६९९ कोटी ३८ लाख २४ हजार
अमरावती५४ हजार ७२९३६ हजार १८९.८६६६ कोटी १९ लाख ११ हजार
नागपूर५० हजार १९४२० हजार ७८३.१६४ कोटी ९१ लाख ६३ हजार

अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा: शेतकऱ्यांचे बांधावरील वाद आता निकाली निघणार; सातबाऱ्यावरील पोटहिश्श्यासाठी 'हा' महत्वाचा निर्णय

टॅग्स :शेतीपाऊसशेतकरीपीकराज्य सरकारसरकारमकरंद पाटीलगारपीटपुणेनागपूर