lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > बीड जिल्ह्यात कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

बीड जिल्ह्यात कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

Fund of Rs.14 crore 90 lakh approved for construction of Krishi Bhawan in Beed district by Dhananjay Munde | बीड जिल्ह्यात कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

बीड जिल्ह्यात कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

आता शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार मदत!

आता शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार मदत!

शेअर :

Join us
Join usNext

बीड जिल्ह्यात कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील पालवन रोड परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी भवनाच्या इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चास १४ कोटी ९० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पालवण रोडवरील कृषी विभागाच्या क्षेत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित आठ विभागांचे अधिनस्त कार्यालय आहेत. तर उर्वरित कार्यालय हे शहरातील अन्य ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव मंत्री मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता.

जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठवलेल्या या प्रस्तावास कृषी मंत्री मुंडे यांच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आली असून आता बीड जिल्हा कृषी भवन बांधण्यासाठी 14 कोटी 90 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचे ज्ञापन बुधवारी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले असून, लवकरच कृषी भवनच्या बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे.

 

Web Title: Fund of Rs.14 crore 90 lakh approved for construction of Krishi Bhawan in Beed district by Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.