केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर्ष २०२५-२६ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अग्रिम अंदाज जाहीर केले आहेत.
त्यानुसार प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनात विक्रमी वाढ अपेक्षित असून अन्नधान्याच्या एकूण उत्पादनात ३.८७ दशलक्ष टन इतकी वाढ होऊन खरीप हंगामात १७३.३३ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.
खरीप तांदूळ आणि मक्याचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राचा सातत्याने विकास होत आहे, असे चौहान यांनी सांगितले.
देशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर परिणाम झाला असला तरी चांगल्या मौसमी पावसामुळे बहुतेक भागांना लाभ झाला आहे, त्यामुळे एकूण अन्नधान्य उत्पादन चांगले होईल, असे ते म्हणाले.
वर्ष २०२५-२६ मधील खरीप पिकांचा उत्पादन अंदाज
◼️ तांदळाचे उत्पादन - १२४.५०४ दशलक्ष टन (मागील वर्षीचे उत्पादनापेक्षा १.७३२ दशलक्ष टन अधिक)
◼️ मक्याचे उत्पादन - २८.३०३ दशलक्ष टन (मागील वर्षीचे उत्पादनापेक्षा ३.४९५ दशलक्ष टन अधिक)
◼️ भरड धान्यांचे एकूण उत्पादन - ४१.४१४ दशलक्ष टन.
◼️ डाळींचे खरीप उत्पादन एकूण - ७.४१३ दशलक्ष टन.
◼️ तूर (अरहर) डाळीचे उत्पादन - ३.५९७ दशलक्ष टन.
◼️ उडीद डाळीचे - १.२०५ दशलक्ष टन.
◼️ मूग डाळीचे - १.७२० दशलक्ष टन.
◼️ एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन - ३७.५६३ दशलक्ष टन.
◼️ शेंगदाण्याचे (भुईमूग) उत्पादन - ११.०९३ दशलक्ष टन (मागील वर्षीचे उत्पादनापेक्षा ०.६८१ दशलक्ष टन अधिक)
◼️ सोयाबीनचे उत्पादन - १४.२६६ दशलक्ष टन.
◼️ उसाचे उत्पादन - ४७५.६१४ दशलक्ष टन (मागील वर्षीचे उत्पादनापेक्षा २१.००३ दशलक्ष टन अधिक)
◼️ कापसाचे उत्पादन - २९.२१५ दशलक्ष गाठी (प्रत्येक गाठ १७० किलोग्रॅम वजनाची)
◼️ ‘पॅटसन’ आणि ‘मेस्टा’ या धाग्यांचे उत्पादन - ८.३४५ दशलक्ष गाठी (प्रत्येकी गाठी.. किलोग्रॅम वजनाची) होण्याचा अंदाज आहे.
हे अंदाज मागील वर्षातील उत्पन्नाचे कल, इतर भू-स्तरीय आधार, प्रादेशिक निरीक्षणे आणि प्रामुख्याने राज्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहेत. प्रत्यक्ष पीक कापणीनंतर उत्पन्नविषयी डेटा उपलब्ध झाल्यावर यात सुधारणा केल्या जातील.
अधिक वाचा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवसुली संदर्भात शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
