गोपाल लाजूरकर
कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात उमेद अभियानांतर्गत ९१ हजार ९२० महिलांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांना लखपतीदीदी बनविण्यात आले. उमेद अभियानांतर्गत गटप्रमाणे १.९ लाख रुपये कर्ज मर्यादा आहे. महिलांची आर्थिक निर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे.
१०२.५० कोटी रुपयांचे कर्ज वर्षभरात महिलांना वितरित
३७,७४० - थेट लाभार्थी महिला.
७२४९० - महिलांना प्रत्येकी १ लाख रु. वाटप.
१५,४४४ - महिलांचे समूह गडचिरोली जिल्ह्यात.
काय आहे अभियान ?
उमेदच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्याची संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि गटविकास सुनिश्वित झाला आहे. कर्जाचा उपयोग मुख्यता व्यवसाय सुरू करणे, उत्पन्न वाढवणे, घरगुती उद्योग, कृषी उपक्रम, छोट्या उद्योगांसाठी केला जातो. जिल्हाभरातील महिला उमेद अभियानाशी समुहाद्वारे संलग्न आहेत.
भारत सरकारचा 'लखपतीदीदी' हा अभिनय उपक्रम असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून कुटुंबांचा सर्वांगीण विकास केला जातो. जिल्हा परिषदेच्या यतीने ह्या अभियानाची जिल्ह्यात व्यापक प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे. - प्रफुल्ल भोपये, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद.
हेही वाचा : पोषणमूल्यांनी समृद्ध बोर देईल वर्षभर उत्पन्न; बोर फळ प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी
